Pune: पुण्यातील पिंपरी चिंचवड येथे धक्कादायक घटना घडली आहे. विजेचा खांब (Electric Poll) डोक्यात पडल्याने भाजी विक्रेता गंभीर जखमी झाला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही घटना शहरातील वाकड परिसरातील म्हातोबा नगर दत्त मंदिर रोड येथे घडली. शनिवारी भाजी विक्रेता हातगाडीवरून नेहमी प्रमाणे भाजी विकण्यासाठी रस्त्यावरून जात होता. त्यावेळीस ही घटना घडली.
त्यावेळीस अचानक एक दुर्घटना घडली आणि विजेचा भला मोठा खांब त्यांच्या अंगावर पडला. या घटनेत भाजीविक्रेता गंभीर जखमी झाला आहे. ही घटना परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भाजी विक्रेत्याला तात्काळ स्थानिकांच्या मदतीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. (हेही वाचा- पिस्तूल आणि जिंवत काडतूस बाळगणाऱ्या तरुणाला अटक, बोरिवली रेल्वे स्थानकावरील घटना)
पाहा व्हिडिओ
;
त्याची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. विजेचा खांब काढणाऱ्या कंत्राटदाराच्या दुर्लक्षामुळे ही घटना घडल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणी कंत्राटीदारावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.