Vistara Airlines FIR Against French Passenger: उडत्या विमानात प्रवास करत असताना एका प्रवाशाने आधी सिगारेट ओढलं. पण एवढ्यावरही या प्रवाशाचे समाधान न झाल्याने त्याने आपल्या सीटवरच शौच केले. पॅरिसहून मुंबईला येणाऱ्या विस्तारा कंपनीच्या (Vistara Airlines) विमानात ही घटना घडली. सहार पोलिसांनी (Sahara Police) या 36 वर्षीय प्रवाशाला फ्रान्समधून गुरुवारी अटक केली. विमानातील सीटवर धूम्रपान आणि शौच केल्याची घटना ऐकून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
एफआयआरनुसार, पॅरिसहून मुंबईला जाणारे यूके 024 क्रमांकाचे फ्लाइट गुरुवारी सकाळी 9.15 वाजता मुंबईच्या छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले. सर्व काही सामान्य होते, परंतु विस्तारा सुरक्षा रक्षकांच्या पथकाने एका अनोळखी व्यक्तीला पकडले आणि त्याला विमानातून बाहेर आणले तेव्हा गोंधळ उडाला. विमानात एक प्रवासी धुम्रपान करत होता आणि त्याने आपल्या सीटवर शौच केली. अधिकाऱ्यांचा सुरुवातीला विश्वास बसला नाही, मात्र त्यांनी या प्रकरणाचा केबिन क्रूकडून अहवाल मागवला. क्रू मेंबर्सनी तयार केलेल्या अहवालाच्या आधारे सुरक्षा रक्षकाने आरोपी फ्रेंच प्रवाशाची झडती घेतली असता त्यांना सिगारेटचे बट आणि त्याने वापरलेला लायटर सापडला. विस्ताराच्या सुरक्षा रक्षकाने लायटर जप्त केले. (हेही वाचा - Bengaluru-Delhi Vistara flight: बेंगळुरू-दिल्ली विस्तारा विमानात चिमूकल्याचा श्वासोच्छ्वास थांबला, डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे वाचले प्राण)
30 हजार रुपयांच्या जामिनावर सुटका -
सीआयएसएफच्या तक्रारीवरून, सहार पोलिसांनी आरोपीला अटक केली आणि त्याच्याविरुद्ध आयपीसीच्या कलम 336 अन्वये विमान नियम, 1937 मधील तरतुदींव्यतिरिक्त 'इतरांचे जीव आणि वैयक्तिक सुरक्षा धोक्यात आणणे' नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला स्थानिक न्यायालयात हजर केले. जिथे त्याला 30 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सोडण्यात आले आहे. (हेही वाचा - Vistara Airline: विस्तारा एअरलाइन्सची 38 उड्डाणे रद्द, नागरी उड्डयन मंत्रालयाने मागितले उत्तर)