Air India Flight (PC - Wikimedia Commons)

Air India Flight Emergency Landing: दिल्लीहून पॅरिसला जाणाऱ्या एअर इंडिया (Air India Flight) विमानाचे दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर (IGI) इमर्जन्सी लँडिंग (Emergency Landing) करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच विमानतळ प्रशासनाने आवश्यक ती सर्व व्यवस्था केली. याअंतर्गत कोणतीही अनुचित घटना टाळता यावी यासाठी अग्निशमन दलापासून ते इतर सर्व आवश्यक व्यवस्था करण्यात आल्या होत्या.

यानंतर, एअर इंडियाच्या विमानाचे सुरक्षित आपत्कालीन लँडिंग करण्यात आले आणि विमानातील सर्व 220 प्रवाशांची सुखरूप सुटका करण्यात आली. (हेही वाचा - DGCA द्वारा इंडिगो एअरलाइन्सला 30 लाख रुपयांचा आर्थिक दंड)

काय आहे नेमकी प्रकरण?

वास्तविक, एअर इंडियाच्या विमानाने दिल्ली विमानतळावरून पॅरिसला उड्डाण केले होते. परंतु काही वेळाने पायलटला विमानाचा टायर फुटू शकतो असे वाटले. या कारणास्तव पायलटने IGI प्रशासनाला माहिती दिली आणि अर्ध्या तासात विमान दिल्ली विमानतळावर परतले. याठिकाणी विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले.