Powai Fire: पवई ह्युंडाई सर्विस सेंटरला भीषण आग, अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी
(Photo Credit - Twitter)

पवई (Pawai) परिसरात एल ॲण्ड टी गेट नंबर ६ समोरील ह्युंडाई सर्विस सेंटर कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या भीषण आगीत कर्मचारी अडकल्याची माहिती मिळत असून आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न अग्निशमन दलाचे जवानानं कडुन केले जात आहे. गॅस सिंलेडरता स्फोट होवुन आग लागल्याची महिती मिळत आहे. मोठ्या प्रमाणात स्फोटचा आवाज आल्याने लोंकानी सांगितले आहे, तसेच अग्रिशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रर्यत्न चालु आहे.

आगीची माहिती मिळताच महापौर किशोरी पेडणेकर हे घटनास्थळी पोहचवुन परिस्थितीची आढावा घेतील अशी महिती मिळत आहे. तसेच आगीमुळे धुरांचे लोळ सभोवतालच्या परिसरात पसरले आहेत. अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्नीशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. सर्विस सेंटरच्या बाजूलाच असलेल्या महावीर क्लासिक इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांमध्ये आगीमुळे भीतीचं वातावरण पसरलं आहे. (हे ही वाचा BMW Car Catches Fire: बीएमडब्ल्यू कार दगडाला धडकली अन जागेवरच पेटली, ट्रायल महागात पडली; कोल्हापूर येथील घटना.)

आगीच्या ठिकाणावरुन स्फोटाचे मोठे आवाज येत आहेत. या ठिकाणी सुरु असलेल्या मदत आणि बचावकार्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली आहे. आगीत कोट्यवधीच्या गाड्या जळून खाक झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. आगीत अद्याप किती नुकसान झालं, याची अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.