कोल्हापूर (Kolhapur) येथील सादळे मादळे (Sadale Madale Dongar Ghat) डोंगर घाटात एका बीएमडब्लूय (BMW) कारने पेट घेतला. ही कार (क्र. MH BX 4545) गॅरेजमधील एका मॅकेनिकने ट्रायलाठी डोंगर घाटात नेली होती. दरम्यान, कारचा ब्रेक न लागल्याने घाबरलेल्या मॅकेनिकने कारमधून उडी मारली आणि चालकाशिवाय धावणारी ही कार पुढे जाऊन दगडाला धडकली. दगडाला धडकताच कारने जागीच पेट (BMW Car Catches Fire In Kolhapur) घेतला. कारचा बर्निंग थरार पाहून अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. मात्र, तोवर कार जळून खाक झाली होती. कारचा केवळ सांगाडा शिल्लख होता. अत्यंत महागडी आणि तितकीच आलीशान असलेली कार जळून खाक झाल्याने मॅकेनिक विरुद्ध तक्रार करण्यात आली आहे.
गोवा येथील कारमालक सलीम अहमद यांची MH BX 4545 क्रमांकाची बीएमडब्ल्यू कार बिघडली होती. त्यामुळे ही कार दुरुस्तीसाठी त्यांनी कोल्हापूर येथील शिरोली परिसरात असलेल्या समीर मिस्त्री यांच्याकडे सोपवली होती. तीन दिवसांमध्ये कारची दुरुस्ती झाली. त्यानंतर मिस्त्रीने ही कार गॅरेजमधून बाहेर काढली आणि ट्रायलसाठी सादळे मादळे घाटात नेली. मात्र, घाटातून परतत असताना कारचा ब्रेक लागला नाही. त्यामुळे घाबरलेल्या मॅकेनिकने कारचे स्टेरींग सोडून कार बाहेर उडी मारली. ही कार पुढे जाऊन दगडाला धडकली. घाबरलेल्या मॅकेनिकने अग्निशमन दलाला माहिती दिली. मात्र, अग्निशमन दलाची गाडी पोहोचली तेव्हा कार जळून खाक झालेल्या अवस्थेत होती. कार मालकाने शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात मॅकेनिक विरोधात तक्रार दिली आहे. प्राप्त तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. चालकाला ही ट्रायल चांगलीच महागात पडल्याची चर्चा या घटनेनंतर सुरु आहे. (हेही वाचा, Mumbai Road Accident: मद्यपी ड्रायव्हरने Bandra-Worli Sea Link वर गाडी ठोकल्याने एक महिला गंभीररित्या जखमी)
दरम्यान, अशाच प्रकारचा कार बर्निंगचा थरार कोल्हापूरमध्ये बुधवारीही पाहायला मिळाला. उचगाव ते टेंबलाई मार्गावर बुधवारी सकाळी साडेदहा वाजणेच्या सुमारास एका कारने अचानक पेट घेतला. ही कार कोल्हापूरच्या दिशेने येत होती. कारने अचानक पेट घेतला. याच वेळी पाठिमागून येणाऱ्या अमित कोराणे नामक दुचाकीस्वाराने प्रसंगावधान दाखवले आणि कारचालक जितेंद्र पटेल यांना काली उतरवले. त्यामुळे कार जळून खाक झाली. मात्र, चालक जितेंद्र पटेल यांचे प्राण वाचले.