Crime: मांजरीच्या पिल्लाला मारल्याप्रकरणी पुण्यातील महिलेविरोधात गुन्हा दाखल
Cats | Representational image | (Photo Credits: Pixabay)

चार महिन्यांच्या मांजरीचे (Cat) पिल्लू मारल्याप्रकरणी चतुःश्रुंगी पोलिसांनी (Chatushrugi police) एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गोखलेनगर (Gokhalenagar) येथील शिल्पा नीळकंठ शिर्के यांच्या विरोधात एफआयआर (FIR) दाखल करण्यात आला आहे. तिचे शेजारी प्रशांत दत्तात्रय गाठे यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 2 एप्रिल रोजी सकाळी 8.15 च्या सुमारास घडली. जेव्हा मांजरीचे पिल्लू महिलेच्या घरी आले तेव्हा तिने तिच्या डोक्यात बोथट वस्तूने मारले. तिने पोलिसांना सांगितले की, मांजरीचे पिल्लू अनेकदा तिच्या घरी यायचे आणि आवाज करत असे. हेही वाचा Shocking! दिवसाढवळ्या चोरांनी पळवून नेला 60 फुट लांबीचा पूल; अधिकारी असल्याचे भासवून ग्रामस्थांच्या डोळ्यात फेकली धूळ

पोलिसांनी तिच्यावर भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम 429 आणि प्राण्यांवर क्रूरता प्रतिबंधक कायद्याच्या कलम 11 (i) (a) आणि (l) नुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी हेड कॉन्स्टेबल मोरे तपास करत आहेत.