पुण्यात (Pune) एका नाईट क्लबमध्ये (Nightclub) काम करणाऱ्या 26 वर्षीय वेटरचा (waiter) इमारतीच्या 13व्या मजल्यावरून उडी मारून मृत्यू झाला आहे. नाईट क्लबशी संबंधित काही लोकांवर आत्महत्येस (Suicide) प्रवृत्त केल्याचा संशय असल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे एका पोलीस अधिकाऱ्याने शनिवारी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी मृताने नाईट क्लब असलेल्या इमारतीच्या 13व्या मजल्यावरून उडी मारली होती. मुंढवा पोलीस ठाण्याच्या (Mundhwa Police Station) अधिकाऱ्याने पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, त्याचा छळ होत असल्याचा दावा त्याच्या नातेवाईकांनी केला आहे.
तो महिनाभरापूर्वीच तेथे रुजू झाला होता. नाईट क्लब व्यवस्थापनाने त्याचा छळ केला, असा त्याच्या नातेवाईकांचा आरोप आहे. आम्ही शुक्रवारी नाईट क्लबशी संबंधित काही लोकांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला, अशी माहिती उपनिरीक्षक गजानन भोसले यांनी दिली. हेही वाचा Mumbai Cyber Crime: मुंबईतील एका 62 वर्षीय व्यक्तीची ऑनलाइन फसवणूक, अज्ञाताने 1.55 लाख रुपयांचा घातला गंडा
ही घटना रात्री 8.45 च्या सुमारास घडली. वेटर टॉयलेटच्या भागात गेला, जिथे एक लहान बाल्कनी आहे आणि त्यातून उडी मारली. त्यावेळी जवळपास कोणीही नव्हते. इमारतीजवळ जमिनीवर उभ्या असलेल्या काही लोकांनी मोठा आवाज ऐकला आणि त्यांनी घटनास्थळी धाव घेतली, असे मुंढवा पोलिसांचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक ब्रम्हानंद नायकवडी यांनी सांगितले.
पोलिस रेस्टॉरंटच्या इतर कर्मचाऱ्यांशी बोलले, पण त्यांना राठोडला कोणत्याच समस्या आहेत किंवा त्याची मानसिक स्थिती याची माहिती नव्हती. ज्यामुळे त्याने टोकाचे पाऊल उचलले. पोलिसांनी त्याच्या खोलीतून आणि सामानातून कोणतीही सुसाइड नोट जप्त केलेली नाही.