Mumbai Cyber Crime: मुंबईतील एका 62 वर्षीय व्यक्तीची ऑनलाइन फसवणूक, अज्ञाताने 1.55 लाख रुपयांचा घातला गंडा
Cyber Crime | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

मुंबईतील (Mumbai) एका 62 वर्षीय व्यक्तीची सायबर फसवणुक (Cyber Fraud) झाली आहे. त्याने आरोप केला आहे की फसवणूक करणाऱ्या व्यक्तीकडे त्याच्या विमा पॉलिसीची (Insurance Policy) अंतर्गत माहिती होती. तसेच त्याला सेटलमेंट रक्कम म्हणून 11 लाख रुपये मिळणार होते. तथापि, फसवणूक करणार्‍याने कंपनीचा अधिकारी म्हणून तोतयागिरी केली. सेटलमेंटची रक्कम मिळविण्यासाठी 1.55 लाख रुपये शुल्क म्हणून हस्तांतरित करण्याची फसवणूक केली. तक्रारदाराने 18 नोव्हेंबर रोजी खार पोलिस ठाण्यात एफआयआर नोंदवला होता. हेही वाचा Mumbai Crime: भांडूपमध्ये 10 वर्षीय विनयभंग केल्याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबलला अटक, भांडुप पोलिसांनी घेतलं ताब्यात

त्याने पोलिसांना सांगितले की, तो रिलायन्स इंडस्ट्रीजमधून निवृत्त झाला असून तो चार्टर्ड अकाउंटंट असलेल्या आपल्या मुलासोबत राहत होता. 2013 मध्ये त्यांनी एका मोठ्या खाजगी क्षेत्रातील बँकेतून पत्नीसाठी विमा पॉलिसी घेतली. अलीकडे, त्याने पॉलिसी आपल्या पत्नीच्या नावावरून मुलाच्या नावावर हस्तांतरित केली आणि त्याला 11 लाख रुपयांची सेटलमेंट रक्कम मिळणार होती.

मी सेटलमेंटच्या रकमेसाठी विमा पॉलिसी कंपनीशी चर्चा करत होतो. त्याच वेळी, मला फसवणूक करणार्‍याचा फोन आला ज्याने सांगितले की तो कंपनीकडून कॉल करत आहे आणि माझी फाइल त्याच्याकडे आहे. त्यासाठी मला शुल्क भरावे लागेल असे त्याने सांगितले. तसेच मला 1.55 लाख रुपये भरण्यास सांगितले. जेव्हा त्याने सलग तिसऱ्या दिवशी पैसे मागण्यासाठी फोन केला तेव्हा मला संशय आला की तो फसवणूक आहे. असे पीडितने सांगितले.

लीक झालेल्या डेटाच्या मदतीने अशा प्रकारच्या सायबर फसवणुकीचे प्रकार इतर कंपन्यांमध्येही घडत आहेत. हे टाळण्यासाठी, IRDA सारख्या काही सरकारी संस्थांनी काही कठोर नियम बनवले पाहिजेत, असे सायबर क्राइम अन्वेषक रितेश भाटिया यांनी सांगितले.