Mumbai: मंत्रालय, नरिमन पॉईंटसाठी धोक्याची घंटा, मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांचा नागरिकांना इशारा
Iqbal Singh Chahal (Photo Credits: ANI/Twitter)

मुंबई (Mumbai) गेल्या दीड वर्षांपासून कोरोनासारख्या महामारीचा सामना करीत असताना मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल (Iqbal Singh Chahal) यांनी नागरिकांना सावधानीचा इशारा दिला आहे. समुद्राच्या वाढत्या पातळीमुळे दक्षिण मुंबईतील नरिमन पॉईंट (Nariman point) आणि राज्य सचिवालय मंत्रालयाचा परिसर (Mantralaya Areas) 2050 मध्ये 80 टक्के पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. निसर्ग चेतवाणी देत आहे. परंतु, लोक सावध झाले नाहीत तर, धोकादायक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे, असे इक्बाल सिंह चहल यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्राचे पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते शुक्रवारी (27 ऑगस्ट) मुंबई हवामान कृती आराखडा आणि त्याची वेबसाइट लॉन्च झाली. त्यावेळी इक्बाल सिंह चहल यांनी म्हटले आहे की, समुद्राच्या वाढत्या पातळीमुळे 2050 मध्ये "कफ परेड, नरिमन पॉइंट आणि मंत्रालयाचा परिसर 80 टक्के पाण्याखाली जाईल. 2050 फार दूर नसल्यामुळे ही फक्त 25-30 वर्षांची बाब आहे. आम्हाला निसर्गाकडून इशारे मिळत आहेत. आपण वेळीच सावध झाले नाहीतर, पुढील 25 वर्षात धोकादायक परिस्थिती निर्माण होईल. पुढच्या पिढीलाच नव्हेतर, सध्याच्या पिढीलाही या धोकादायक परिस्थितीला सामोरे जावा लागेल, असे इक्बाल सिंह यांनी म्हटले आहे. हे देखील वाचा- Petrol, Diesel Prices: मुंबई, दिल्ली, चेन्नईसह भारतातील प्रमुख शहरांतील पेट्रोल, डिझेल दर घ्या जाणून

इक्बाल सिंह चहल पुढे म्हणाले की, मुंबई हे दक्षिण आशियातील पहिले शहर आहे जे आपला हवामान कृती आराखडा तयार करत आहे आणि त्यावर कार्य करत आहे. आधी आम्ही हिमनद्या वितळण्यासारख्या हवामान बदलाच्या घटनांबद्दल ऐकत होतो. पण त्याचा थेट परिणाम आमच्यावर होत नाही. मुंबईत गेल्या 129 वर्षात मागील वर्षी नैसर्गिक आपत्ती आली. मुंबईत गेल्या 15 महिन्यात 3 चक्रीवादळांनी धडक दिली आहे. त्यानंतर5 ऑगस्ट 2020 रोजी नरिमन पॉइंटवर सुमारे 5 ते 5.5 फूट पाणी जमा झाले.

अलीकडेच शहराला हवामानाच्या काही गंभीर परिस्थितींचा सामना करावा लागत आहे. नुकताच मुंबईत शहराला तौक्ते चक्रीवादळाचा सामना करावा लागला. मुंबईत 6 आणि 7 जूनदरम्यान मान्सून दाखल होते. परंतु, 17 मे रोजी 214 मिमी पाऊस पडला आहे. 9 जूनपूर्वी, मुंबईत जूनच्या 84 टक्के पावसाची नोंद झाली आणि जुलैमध्ये, महिन्याच्या सरासरीच्या 70 टक्के पाऊस फक्त चार दिवसांत 17 ते 20 जुलै दरम्यान झाला. वाढत्या हवामानातील अनिश्चिततेमुळे मुंबई हवामान कृती आराखडा अंतर्गत डेटा मूल्यांकनामुळे सर्वाधिक असुरक्षित क्षेत्रे आणि समुदाय ओळखले गेले आहेत, असे बृहन्मुंबई महानगरपालिकेने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.