Petrol, Diesel Prices: मुंबई, दिल्ली, चेन्नईसह भारतातील प्रमुख शहरांतील पेट्रोल, डिझेल दर घ्या जाणून

पेट्रेल-डिझेल दरांनी सर्वासामान्यांना काहीसा दिलासा दिला आहे. पेट्रोल-डिझेल (Petrol Diesel) तर फारसे कमी झाले नसले तरी किमान ते वाढले तरी नाहीत. आज (28 ऑगस्ट) सलग चौथा दिवस आहे. पेट्रोल डिझेल दर (Petrol Diesel Rates) स्थिर आहेत.

Petrol, Diesel Prices: मुंबई, दिल्ली, चेन्नईसह भारतातील प्रमुख शहरांतील पेट्रोल, डिझेल दर घ्या जाणून
Petrol-Diesel Price | Image Used For Representational purpose Only (Photo Credits: Pixabay.com)

पेट्रोल-डिझेल दर (Petrol Diesel Rates) हे प्रतिदिन बदलणारे आणि सर्वसामान्यांच्या उत्सुकतेचा विषय. दरम्यान,या आठवड्यात मात्र पेट्रेल-डिझेल दरांनी सर्वासामान्यांना काहीसा दिलासा दिला आहे. पेट्रोल-डिझेल (Petrol Diesel) तर फारसे कमी झाले नसले तरी किमान ते वाढले तरी नाहीत. आज (28 ऑगस्ट) सलग चौथा दिवस आहे. पेट्रोल डिझेल दर (Petrol Diesel Rates) स्थिर आहेत. मुंबई, दिल्ली आणि चेन्नई अशा चार प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर अनुक्रमे प्रति लिटर पेट्रोल 107.52 रुपये- डिझेल 96.48 रुपये, पेट्रोल 101.82 रुपये -डीझेलल 91.98 रुपये, पेट्रोल 99.20 रुपये आणि डिझेल 93.52 रुपये इतक्या दराने विकले जात आहे.

देशातील प्रमुख शहरांतील प्रेटोल -डिझेल प्रतिलिटर दर

दिल्ली:

पेट्रोल – 101.49 प्रति लीटर

डिझेल- 88.92 प्रति लीटर

मुंबई:

पेट्रोल – 107.52 प्रति लीटर

डिझेल– 96.48 प्रति लीटर

कोलकाता:

पेट्रोल – 101.82 प्रति लीटर

डिझेल– 91.98 प्रति लीटर

चेन्नई:

पेट्रोल – 99.20 रुपये प्रति लीटर

डिझेल– 93.52 प्रति लीटर

बेंगलुरु:

पेट्रोल – 104.98 प्रति लीटर

डिझेल– 94.34 प्रति लीटर

भोपाल:

पेट्रोल – 109.91 प्रति लीटर

डिझेल– 97.72 प्रति लीटर

लखनऊ:

पेट्रोल- 98.56 रुपये प्रति लीटर,

डिझेल- 89.29 रुपये प्रति लीटर

पटना:

पेट्रोल – 103.99 प्रति लीटर

डिझेल– 94.75 प्रति लीटर

चंडीगढ:

पेट्रोल – 97.66 प्रति लीटर

डिझेल– 86.62 रुपये प्रति लीटर

(हेही वाचा, Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल दर दररोज घ्या जाणून फक्त एका SMS च्या माध्यमातून)

देशातील प्रत्येक पेट्रल पंपावर दररोज सकाळी 6 वाजता नवे दर लागू होतात. कारण प्रत्येक ठिकाणचे स्थानिक महसूली कर वेगवेगळे असतात. त्यामुळे प्रत्येक राज्यात अनेकदा पेट्रोल डिझेल तर वेगवेगळे असू शकतात. आपण पेट्रोल-डिझेलचे आपल्या प्रदेशातील दर SMS च्या माध्यमातून जाणून घेऊ शकता. त्यासाठी आपल्याला इंडियन ऑयल SMS सेवेच्या माध्यमातून मोबाइल नंबर 9224992249 वर SMS पाठवू शकता. त्यासाठी आपला मेसेज असा लिहायला हवा. RSP<स्पेस>पेट्रोल पंप डीलर कोड. आपल्या परिसरातील RSP साईटवर जाऊन तपासू शकता. हा मेसेज पाठवल्यानंतर काही सेकंदात आपल्या फोनवर ताजे पेट्रोल, डिझेल दर उपलब्ध होऊ शकतात.

(The above story first appeared on LatestLY on Aug 28, 2021 11:12 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).