
Coronavirus: हिंगोलीत (Hingoli) आज पुन्हा 6 नवे कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. हे सर्व रुग्ण मुंबईहून (Mumbai) हिंगोली जिल्ह्यात (Hingoli District) परतलेले होते. या 6 जणांना कोरोना सेंटरमध्ये भरती करण्यात आले आहे. या सर्वांची प्रकृती ठीक असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीवास यांनी सांगितले आहे. हिंगोली जिल्ह्यात सद्यस्थितीला 18 कोरोना बाधीत रुग्ण आहेत. दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण होत आहे.
दरम्यान, गुरुवारी हिंगोली जिल्ह्यातील 5 जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे त्यांना उपचानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्ह्यातील सिमा 31 मे पर्यंत राहणार आहेत. यासंदर्भात तेथील जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये माहिती दिली होती. (हेही वाचा - मुंबई: कोरोनावर मात करून आलेल्या ASI किरण पवार यांचंं स्वागत टाळ्या, पुष्पवर्षावाने (Watch Video))
मुंबई येथून हिंगोलीत परतलेल्या 6 जणांना कोरोनाची लागण
•सद्यस्थितीत जिल्ह्यात 18 कोरोना बाधीत रुग्ण @VarshaEGaikwad @MahaDGIPR @InfoMarathwada @InfoDivLatur
— District Information Office, Hingoli (@InfoHingoli) May 23, 2020
महाराष्ट्रात कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. शुक्रवारी राज्यात 2940 नव्या कोरोना बाधीत रुग्णांची भर पडली. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 44582 वर पोहोचली आहे. याशिवाय काल 857 रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. सध्या राज्यात एकूण 30 हजार 474 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.