मुंबई: कोरोनावर मात करून आलेल्या ASI किरण पवार यांचंं स्वागत टाळ्या, पुष्पवर्षावाने (Watch Video)
Mumbai Police ASI Kiran Pawar (Photo Credits: ANI/Screenshot)

मुंबई पोलिस खात्यातील असिस्टंट पोलिस इन्सपेक्टर (ASI) किरण पवार (Kiran Pawar) यांनी कोरोनावर मात करून पुन्हा घरी हजेरी लावल्यानंतर त्यांच्या आजुबाजूच्या भागातील लोकांनी त्यांच्यावर फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव करत त्यांचं स्वागत केलं आहे. मुंबईतील या कोव्हिड योद्धाच्या घरवापसीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियामध्ये अनेकांनी शेअर केला आहे. व्हिडिओ मध्ये किरण पवार येताच त्यांच्या आजुबाजूच्या लोकांकडून त्यांच्या स्वागतासाठी टाळ्यांचा कडकडाट आणि डोक्यावर फुलांच्या पाकळ्या उधळलेल्या पहायला मिळाल्या आहेत. सोबतच 'भारत माता की जय', ' गणपती बाप्पा मोरया' अशा जयघोषामध्ये त्यांचं स्वागत करण्यात आलं आहे. Maharashtra Police: कोरोनावर मात करुन ड्युटीवर रुजू झालेल्या महाराष्ट्र पोलिसांचा प्रेरणादायी व्हिडिओ नक्की पाहा, जनतेला देतायत मोलाचा संदेश.

 

Video of ASI Pawar Receiving Grand Welcome:

दरम्यान महाराष्ट्रामध्ये कोरोनाबाधित रूग्णांच्या संख्येमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. सध्या मुंबई मध्ये एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 27 हजारांच्या पार गेला आहे. तर महाराष्ट्र राज्यामध्ये 44582 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. 1500 पेक्षा अधिक जणांचा जीव गेला आहे. यापैकी महाराष्ट्र पोलिसांचा कोरोनाबाधितांचा आकडा 1600 पेक्षा अधिक आहे. 16 पेक्षा अधिक पोलिस कर्मचार्‍यांनी आ पले प्राण देखील गमावले आहेत. ठाणे: श्रीनगर पोलीस स्टेशन येथील कॉन्स्टेबल प्रतिभा गवळी यांचा कोरोना व्हायरसशी झुंज देताना मृत्यू

महाराष्ट्रामध्ये येती रमजान ईद आणि मागील दोन महिन्यांपासून अहोरात्र मुंबई पोलिस कोरोना व्हायरस लॉकडाऊनच्या बंदोबस्ताला असल्याने त्यांच्यावर  ताण आहे. यामधून काही पोलिस अधिकार्‍यांना, कर्मचार्‍यांना आराम मिळावा म्हणून केंद्राचे निमलष्करी पथक राज्यात दाखल करण्यात आले आहे. मुंबई, औरंगाबाद, नाशिक, अमरावती इथे हे जवान तैनात करण्यात आले आहेत.