महाराष्ट्रात (Maharashtra) दिवसेंदिवस कोरोना व्हायरस वाढत चाललेला फैलाव पाहता जनतेचे मनोबल देखील ढासळत चालले आहे. त्यात लॉकडाऊन (Lockdown) देखील वाढत चालल्यामुळे लोकांमध्ये नैराश्याची भावन निर्माण होतेय. तसेच ज्यांच्यामध्ये कोरोनाची लक्षण आढळली वा आढळताय ते नैराश्यापायी, भीतीपायी पूर्णपणे कोलमडून गेले आहेत. यासाठी अनेक जण आत्महत्येचा पर्याय निवडतायत. मात्र या सर्वांना धैर्य देणारा आणि त्यांचे मनोबल वाढवणारा व्हिडिओ महाराष्ट्र पोलिसांनी (Maharashtra Police) शेअर केले आहे. या व्हिडिओमध्ये कोरोनावर मात करुन पुन्हा कामावर नव्या जोमाने रूजू झालेल्या महाराष्ट्र पोलिसांचा व्हिडिओ शेअर केला आहे.
या व्हिडिओमध्ये कोरोना संक्रमित पोलिस कोरोनावर मात केली असून पुन्हा कामावर रुजू झाले आहेत. कोरोनाची लागण झाल्याचे समजताच त्यांनी कसा यातून मार्ग काढला आणि बिकट परिस्थितीत धैर्याने तोंड दिले याचा अनुभव त्यांनी सांगितला आहे. Maharashtra Police: महाराष्ट्रात गेल्या 48 तासांत आढळले 278 पोलीस COVID-19 पॉझिटिव्ह, एकूण संख्या 1,666 वर
कोरोनावर मात करून ड्युटीवर परत आलेले हे #CoronaWarriors तुम्हाला एक संदेश देत आहेत- कोरोनाला न घाबरण्याचा संदेश.
आपल्यालाही लक्षण आढळल्यास कृपया न घाबरता नक्की तपासणी करून घ्या.#AamhiDutyVarAahot#WarAgainstVirus pic.twitter.com/wfa9bSCLj5
— Maharashtra Police (@DGPMaharashtra) May 23, 2020
कठीण प्रसंगातून मार्ग काढा त्याला घाबरून जाऊ नका असे या पोलिसांनी व्हिडिओमध्ये सांगितले. तसेच संकट ही येतच असतात. प्रत्येक समस्येचे अनेक मार्ग निघतात. अशा या कोविड योद्धांना जे कोरोनाशी दोन हात करुन विजयी होऊन परतले त्यांना लेटेस्टली मराठीचा सलाम.