Maharashtra Police: महाराष्ट्रात गेल्या 48 तासांत आढळले 278 पोलीस COVID-19 पॉझिटिव्ह, एकूण संख्या 1,666 वर
Maharashtra Police (Photo Credit: Twitter)

महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे राज्यातील ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी जनतेसाठी तैनात असलेल्या पोलिसांनाही झपाट्याने या विषाणूची लागण होत आहे. गेल्या 48 तासांत 278 महाराष्ट्र पोलिसांना (Maharashtra Police) कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळत आहे. यामुळे राज्यात कोरोना संक्रमित पोलिसांची एकूण संख्या 1,666 वर पोहोचली आहे. सद्य स्थितीत 1,177 पोलिस उपचार घेत असून 473 पोलीस बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. तर 16 महाराष्ट्र पोलिस दगावल्याची माहिती महाराष्ट्र पोलिस विभागाने दिली आहे.

त्याचबरोबर महाराष्ट्रात लॉकडाऊन दरम्यान आतापर्यंत IPC 188 च्या अंतर्गत 1,12,008 गुन्हे दाखल करण्यात आले आहे. Lockdown दरम्यान पोलिसांवर हल्ला केलेल्या 823 जणांना अटक करण्यात आली आहे. तर नियमांचे उल्लंघन करणा-या 69,046 वाहने जप्त करण्यात आली आहे.

हेदेखील वाचा- मुंबई: कोरोना विषाणूमुळे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भिवसेन हरिभाऊ पिंगळे यांचा मृत्यू

पाहा संपूर्ण यादी

महाराष्ट्र राज्यात काल दिवसभरात 2,345 नव्या रुग्णांची भर पडली असून राज्यात कोरोना रुग्णांची संख्या 41,642 इतकी झाली आहे. यात 1,454 रुग्णांचा मृत्यू झाला असून 11,726 रुग्ण बरे झाले आहेत.

तर देशात एकूण कोरोना संक्रमितांची संख्या 1,18,447 वर पोहोचली असून एकूण 3583 रुग्ण दगावल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. भारतात सद्य स्थितीत 66,330 रुग्णांवर उपचार सुरु असून 48,534 रुग्ण बरे झाल्याची माहिती देखील आरोग्य विभागाकडून मिळत आहे.