ठाणे: श्रीनगर पोलीस स्टेशन येथील कॉन्स्टेबल प्रतिभा गवळी यांचा कोरोना व्हायरसशी झुंज देताना मृत्यू
Maharashtra Police | (File Photo)

मुंबई सह महाराष्ट्रामध्ये आता कोरोना व्हायरसचा विळखा वाढत आहे. दरम्यान यामध्ये पोलिस कर्मचार्‍यांचाही समावेश आहे. ठाणे शहरामध्ये आज (23 मे) श्रीनगर पोलीस स्टेशन येथील कॉन्स्टेबल प्रतिभा गवळी (PC Pratibha Gawli)  यांची कोरोना व्हायरस (Coronavirus) विरूद्धची झुंज अपयशी ठरली आहे. महाराष्ट्र पोलिस खात्याच्या ट्वीटर अकाऊंटवरून ही माहिती देताना पोलीस महासंचालक व महाराष्ट्र पोलीस दलाचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडून त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली आहे. Maharashtra Police: कोरोनावर मात करुन ड्युटीवर रुजू झालेल्या महाराष्ट्र पोलिसांचा प्रेरणादायी व्हिडिओ नक्की पाहा, जनतेला देतायत मोलाचा संदेश.  

महाराष्ट्रामध्ये देशातील सर्वाधिक कोरोनाबाधित रूग्ण आहेत. यामध्ये कोरोना व्हायरस लॉकडाऊनचं काटेकोर पालन व्हावं यासाठी पोलिस कर्मचार्‍यांना बंदोबस्तासाठी ठेवण्यात आलं आहे. दरम्यान वाढता धोका पाहता आता 50 वर्षावरील पोलिस कर्मचार्‍यांना घरीच राहण्याचे आदेश आहे. सध्या महाराष्ट्रात पोलिसांच्या सुरक्षेसाठी केंद्रातील निमलष्करी पोलिस दलाचे जवान आता तैनात करण्यात आले आहेत.

महाराष्ट्र पोलिस ट्वीट

महाराष्ट्रात कोरोनाबाधित पोलिसांचा आकडा 1600 पेक्षा अधिक आहे. काल पोलिस खात्याकडून दिलेल्या महितीनुसार, 48 तासात 278 जणांना कोरोनाची बाधा झाली होती. दरम्यान मुंबई पोलिस खात्यातील कर्मचार्‍याचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना 60 लाखाची मदत केली जाईल अशी माहिती देण्यात आली आहे.