Mumbai Cyber Police कडून इन्शुरंस फर्मचा प्रतिनिधी असल्याचा खोटा दावा करत फसवणूक केल्याप्रकरणी 6 जणांना अटक
Representative image

मुंबई (Mumbai)  मध्ये सायबर पोलिस ऑफ मुंबई क्राईम ब्रांच (Cyber Police of the Mumbai Crime Branch) यांच्याकडून 6 जणांना अटक करण्यात आली आहे. या सहा जणांकडून आपण इन्शुरन्स कंपनीचे प्रतिनिधी असल्याचा दावा करत अनेकांची फसवणूक करून लाखो रूपये उकळल्याचा आरोप आहे. गुंतवणूकीवर मोठा नफा आणि व्याज दराविना कर्ज अशा आकर्षक ऑफर्स दाखवून त्यांनी अनेकांना आपल्या जाळ्यात ओढल्याचं समोर आलं आहे. अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तरप्रदेश मधून 4, हरियाणा आणि नवी दिल्ली मधून 2 जणांना त्यांनी ताब्यात घेतलं आहे.

3 मार्च दिवशी सायबर पोलिस स्टेशन मध्ये एक तक्रार नोंदवण्यात आली होती. त्यामध्ये एका व्यक्तीला 19.27 लाखांची फसवणूक झाल्याचा दावा करण्यात आला. यामध्ये इन्शुअरंस एजंट असल्याचा खोटा दावा करून आर्थिक फसवणूक झाल्याचं एफआयआर मध्ये नमूद करण्यात आलं आहे. सोबतच इंडियन पिनल कोड आणि आयटी अ‍ॅक्ट अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नक्की वाचा: Cyber Fraud Alert: 15 दिवसांत पैसे डबल करण्याचे आमिष; अॅपद्वारे फ्रॉडरने लंपास केले तब्बल 250 कोटी .

इन्शुअरंस कंपनीकडून प्रतिनिधी असल्याचा दावा करणारा कॉल ज्या नंबरवरून आला त्याला पोलिसांनी ट्रेस केले आहे. हा नंबर IRDA of India, Hyderabad ला देण्यात आलं आहे. त्याने खोटे दावे करून सीम कार्ड घेतल्याचं नंतर पोलिसांच्या लक्षात आलं. त्यावरून त्याला अटक करण्यात आली आहे. त्या आरोपीने दिलेल्या माहितीनुसार, खोटी कागदपत्र वापरून सीम कार्ड विकत घेतल्याचं समोर आलं आहे.