Cyber Crime | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

मुंबई मध्ये एका खाजगी कंपनीत अकाऊंट ऑफिसर म्हणून काम करणारी 34 तरूणी सायबर फ्रॉडची बळी पडली आहे. यामध्ये या तरूणीने 1.80 लाख गमावले आहेत. ऑनलाईन पॅन कार्ड अपडेट (PAN Card Update) करताना आलेल्या टेक्स्ट मेसेज वर क्लिक केल्यानंतर तिला हा आर्थिक गंडा घालण्यात अला आहे.

सांताक्रुझ पोलिस स्टेशन मध्ये 16 मे दिवशी एक एफआयआर सादर करण्यात आली आहे. तरूणीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार ही घटना 9 मे ची आहे. ती विलेपार्ले येथे तिच्या ऑफ़िसमध्ये होती. यावेळी एका टेक्स्ट मेसेज वर तिला पॅन कार्ड अपडेट करण्यासाठी मेसेज आला.

तरूणीने जेव्हा लिंक वर क्लिक केले तेव्हा एचडीएफसीचं एक फेक अकाऊंट ओपन झालं. यावर तिला युजर आयडी आणि पासवर्ड देण्यास सांगितलं. यानंतर तिला एक ओटीपी आला. यानंतर तिने ओटीपी आणि पॅन कार्ड डिटेल्सही टाकले. काही क्षणात तिच्या अकाऊंट मधून 1.80 लाख कापले गेले. हे ट्रान्झॅक्शन पाहून तिने बॅंकेला प्रकार कळवून अकाउंट ब्लॉक करायला सांगितलं. नंतर लगेच तिने पोलिसात जाऊन तक्रार देखील नोंदवली. हे देखील नक्की वाचा:  Mumbai Cyber Crime: महिलेचा फोन हॅक करत Private Photos वरून ब्लॅकमेलिंग करणार्‍या पुरूषाला पुण्यात अटक .

पोलिसांनी कलम 419,420 अंतर्गत एफआयआर नोंदवून घेतली आहे. आयटी अ‍ॅक्ट अंतर्गत 66 डी आणि 66 सी खाली देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.