Navi Mumbai: ऑनलाइन टास्क करण्यास भाग पाडून 33 वर्षीय व्यक्तीला सायबर चोरट्यांनी लावला 43 लाखांहून अधिक रुपयांचा चुना
Cyber Crime | Representational Image (Photo Credits: Pixabay)

Navi Mumbai: नवी मुंबईतील एक 33 वर्षीय व्यक्ती ऑनलाइन टास्क (Online Tasks) फसवणुकीचा ताजा बळी ठरला आहे. मोठा परतावा मिळवण्याच्या बहाण्याने फसवणूक करणाऱ्यांकडून त्याला 43 लाखांहून अधिक रुपयांचा चुना लावण्यात आला. फसवणूक करणाऱ्यांनी कोपरखैरणे भागातील रहिवासी असलेल्या व्यक्तीशी व्हॉट्सअॅपवर संपर्क साधला आणि त्याला सांगितले की, जर त्याने ऑनलाइन कामांसह अर्धवेळ नोकरी पूर्ण केली तर तो चांगले पैसे कमवू शकतो.

चांगला परतावा मिळण्याच्या आशेने, पीडितेने वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये 43.45 लाख रुपये भरले. परंतु त्यांना मोबदला मिळाला नाही. भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम 420 (फसवणूक आणि अप्रामाणिकपणे मालमत्तेचे वितरण) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. (हेही वाचा - Attack On Vaijnath Waghmare: सुषमा अंधारे यांचे विभक्त पती वैजनाथ वाघमारे यांच्या गाडीवर दगडफेक; मुख्यमंत्र्यांकडे सुरक्षेची मागणी)

ऑनलाइन टास्क फ्रॉड मध्ये सामान्यत: पीडितांना व्हिडिओ लाईक इत्यादीसारखी कामे करण्यास भाग पाडले जाते आणि त्यांचा विश्वास जिंकण्यासाठी सुरुवातीला छोटी पेमेंट केली जातात. पीडितांना नंतर मोठा परतावा मिळविण्यासाठी पैसे गुंतवण्याचे आमिष दाखवण्यात येते.

यापूर्वी, सायबर चोरट्यांनी अनेकांना गंडा घातला आहे. दररोज अनेक नागरिक ऑनलाईन टास्क फडवणूकीचे बळी ठरत आहेत. टेलिग्रामच्या माध्यमातून सायबर चोरटे रोज सर्वसामान्य लोकांची लाखो रुपयांची फसवणूक करत आहेत. मात्र, अद्याप सायबर चोरट्यांचे हे जाळे पकडण्यात पोलिसांना यश आलेलं नाही.