Maharashtra Assembly Election 2019: ईव्हीएम डोळ्यासमोर ठेवूनच मतदान आणि मत मोजणी यात 3 दिवसाचे अंतर? छगन भुजबळ यांच्याकडून शंका व्यक्त
छगन भुजबळ (फोटो सौजन्य-Twitter)

निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 (Maharasta Assembly Election 2019) ची घोषणा आज ( शनिवार, 21 सप्टेंबर) करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाकडून अगामी विधानसभा निवडणुकीची घोषणा केल्यानंतर अनेक राजकीय नेत्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 चा निकाल 24 ऑक्टोंबर रोजी लागणार आहे. परंतु, राष्ट्रवादीचे नेते (National Congress Party) छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्याकडून मतदान आणि मत मोजणी (Vote Counting), यात 3 दिवसाचे अंतर का? अशी, शंका व्यक्त करण्यात आली आहे. या दरम्यान काहीही घडू शकते, असे वक्तव्यही त्यांनी केले आहे.

लोकसभा निवडणूक 2019 मध्ये भाजप सरकारने मोठा घोटाळा केला आहे, असा आरोप अनेक राजकीय नेत्यांनी केला होता. यामुळे येत्या विधानसभेच्या निवडणुकीत ईव्हीएम मशीनचा वापर टाळून, बॅलेट पेपरचा वापर करावा, अशी मागणीही अनेकांकडून करण्यात आली होती. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी अगामी विधानसभा निवडणुकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मतदान आणि मत मोजणी यांच्यात 3 दिवसाचा अंतर का? असा प्रश्न भुजबळ यांनी निर्माण केला आहे. या 3 दिवासाच्या कालावधीत कोणताही गैरप्रकार घडू शकतो, अशी शंका त्यांनी व्यक्त केली आहे. हे देखील वाचा- Assembly Election 2019: दिवाळी आधीच युतीची दिवाळी; निवडणुकीची घोषणा होताच शिवसेना नेते संजय राऊत यांची प्रतिक्रिया

छगन भुजबळ हे शिवसेनेत प्रवेश करतील, अशा चर्चेंना उधाण आले होते. परंतु शेवटी राष्ट्रवादीचा पक्ष सोडून इतर कुठेही जाणार नसल्याचे भुजबळ यांनी स्पष्ट केले होते. अगामी विधानसभा निवडणुकीत छगन भुजबळ यांना उमेदवारी मिळेल का? याकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे.