Maharashtra Police (Photo Credit: Twitter)

Coronavirus Cases In Maharashtra Police: गेल्या 24 तासात 279 पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्र पोलिस दलातील (Maharashtra Police) एकूण कोरोनाग्रस्त कर्मचाऱ्यांची संख्या 5454 वर पोहचली आहे. यातील 1078 रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच आतापर्यंत महाराष्ट्र पोलिस दलातील 70 कर्मचाऱ्यांचा कोरोना विषाणूची (Coronavirus) लागण झाल्याने मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्रात कोरोना बाधितांची (Corona Positive) संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशातचं कोरोना योद्धा म्हणून काम करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोना व्हायरसने विळखा घातला आहे. रविवारी महाराष्ट्र पोलिस दलातील ४ पोलीस कर्मचाऱ्यांचा (4 Policemen Died) मृत्यू झाला. तर 30 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. आज महाराष्ट्र पोलिस दलातील कोरोनाग्रस्त रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे. (हेही वाचा -जालना जिल्ह्यात आज 56 नवे कोरोनाबाधित रुग्ण; कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आजपासून पुढील 10 दिवस कडक संचारबंदी लागू)

दरम्यान, महाराष्ट्रात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. रविवारी राज्यात तब्बल 6 हजार 555 नव्या रुग्णांची नोंद झाली. तर 125 रुग्णांचा कोरोना विषाणूमुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 2 लाख 6 हजार 619 इतकी झाली आहे. यापैकी 8 हजार 822 जणांचा मृत्यू झाला आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या कोरोना रुग्णांमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.