Coronavirus in Mumbai: मुंबईमध्ये आज कोरोना विषाणूच्या 2,321 रुग्णांची नोंद; शहरामधील एकूण संख्या 1,67,608 वर
Coronavirus | Representative Image (Photo Credit: PTI)

गेल्या काही दिवसांपासून मुंबई (Mumbai) मधील कोरोना विषाणू (Coronavirus) रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ होत असलेली दिसून येत आहे. आज शहरामध्ये 2,321 कोरोना विषाणू रुग्णांची नोंद झाली आहे. यासह एकूण संक्रमितांची संख्या 1,67,608 वर पोहोचली आहे. आज मुंबईमध्ये कोरोनाचे 772 रुग्ण बरे झाले असून, आतापर्यंत एकूण 1,30,016 रुग्ण बरे झाले आहेत. सध्या शहरामध्ये कोरोना विषाणूच्या 29,131 सक्रीय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आज मुंबईमध्ये 42 रुग्णांचा मृत्यू झाला असून, आतापर्यंत 8,106 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. बीएमसीने याबाबत माहिती दिली.

आज मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी 37 रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. त्यातील 26 रुग्ण पुरुष व 16 रुग्ण महिला होत्या. 1 जणाचे वय 40 वर्षा खाली होते. 23 जणांचे वय 60 वर्षा वर होते, तर उर्वरित 18 रुग्ण 40 ते 60 वर्षा दरम्यान होते. सध्या मुंबई जिल्ह्यातील बरे झालेल्या रुग्णांचा दर 78 टक्के आहे. 5 सप्टेंबर ते 11 सप्टेंबर पर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर 1.21 टक्के आहे. 11 सप्टेंबर 2020 पर्यंत मुंबईमध्ये झालेल्या कोविडच्या एकूण चाचण्या 9,03,101 इतक्या आहेत. यासह मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा दर आता कमी होऊन 58 दिवस झाला आहे. (हेही वाचा: कोरोना विषाणू सोबत जगण्यासाठी जीवनशैलीमध्ये बदल करणे आवश्यक; BMC ने जारी केल्या वैयक्तिक, कौटुंबिक व सामाजिक स्तरावर काळजी घेण्यासाठी मार्गदर्शक सूचना)

एएनआय ट्वीट -

मुंबईमधील प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून, 11 सप्टेंबर नुसार मुंबईमध्ये सक्रिय कंटेनमेंट झोन (झोपडपट्ट्या आणि चाळी) ची संख्या 557 आहे, तर सक्रिय सीलबंद इमारती 7,680 आहेत. दरम्यान, महाराष्ट्रामध्ये आज 22,084 नवे रुग्ण आढळले असून, आता राज्यातील एकूण बाधितांची संख्या 10,37,765 झाली आहे. राज्यात आज 13,489 रुग्ण बरे झाले असून, आतापर्यंत एकूण 7,28,512 रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात मागील 24 तासांत 391 रुग्ण दगावल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.