Thane: ठाण्यात वर्दळीच्या रस्त्यावर ऑटो-रिक्षा प्रवाशांची चेन लुटताना 2 दुचाकीस्वार कॅमेऱ्यात कैद, पहा व्हिडिओ
2 bikers caught on camera robbing auto-rickshaw passengers (PC - X/@QueenofThane)

Thane: ठाण्यातून ऑटो-रिक्षा प्रवाशांची (Auto-Rickshaw Passenger) चेन लुटताना दोन तरुण कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. X वर @QueenofThane या खात्यावरून या घटनेचा धक्कादायक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये दुचाकीस्वार असलेले दोन पुरुष ऑटो-रिक्षा प्रवाशाची चेन हिसकावताना दिसत आहेत. X वापरकर्त्याचा दावा आहे की, ही घटना 5 मे च्या रात्री ठाणे जिल्ह्यातील कापूरबावडी, घोडबंदर रोड येथे घडली. या प्रकरणी काही कारवाई झाली की नाही हे अद्याप समजू शकलेले नाही.

या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, दोन तरुण वेगाने ऑटो-रिक्षाजवळ येऊन प्रवाशाची चेन हिसकावून घेऊन जातात. व्हिडिओ शेअर करणाऱ्या X वापरकर्त्याने सांगितल्यानुसार, ही घटना त्याच रस्त्यावर चालत असलेल्या कारच्या डॅश कारवर रेकॉर्ड झाली आहे. (हेही वाचा -Viral Video: बाईकवर स्टंट करणंं पडंल महागात, व्हिडिओ व्हायरल होताच गुन्हा दाखल)

या यूजरने व्हिडिओ शेअर करताना पोस्टमध्ये म्हटले आहे की, तुम्ही ठाण्यात ऑटो रिक्षाने प्रवास करत असाल तर चेन स्नॅचर्सपासून सावध राहा. आणि तुमच्या मालकीची कार असेल तर अशा घटनांची नोंद करण्यासाठी कृपया डॅश कॅम खरेदी करा. सिटी कारमध्ये डॅश कॅम ही आता सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. ही घटना कापूरबावडी घोडबंदर रोडवरील आहे. (हेही वाचा - Palghar News: स्टंटबाजी बेतली जीवावर! दाभोसा धबधब्यावर 120 फूट खोल डोहात उडी मारल्याने पर्यटकाचा मृत्यू)

पहा व्हिडिओ - 

दरम्यान, ठाणे जिल्ह्यात चेन स्नॅचिंगच्या घटना काही नवीन नाहीत. 27 फेब्रुवारी रोजी एका ज्येष्ठ नागरिकाची सोनसाखळी जबरदस्तीने हिसकावून घेतल्यानंतर अवघ्या 24 तासांत तीन चेन स्नॅचरला पोलिसांनी अटक केली होती. या तिघांना विरार पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने भिवंडी येथून अटक केली. आरोपींमध्ये टोळीचा सराईत अजगर खान उर्फ ​​अज्जू (वय, 43) यांचा समावेश आहे, त्याच्यावर भिवंडी, वालीव आणि विरारसह पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. मिराज अहमद अन्सारी (वय, 33) आणि जमाल अन्सारी (वय, 38) अशी त्याच्या साथीदारांची नावे आहेत. ते सर्व भिवंडीचे रहिवासी आहेत.