Palghar News: पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यात(Jawhar taluka)दाभोसा धबधबा नेहमीच पर्यटकांचे आवडते ठिकाण असते. मात्र, रविवारी (ता. ५) दुपारच्या सुमारास तेथे एक भयानक घटना घडली. दाभोसा धबधब्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांनी तब्बल १२० फुटावरून पाण्यात उडी घेतली. यात दुर्दैवाने एका तरुणाचा मृत्यू(Tourist Dies)झाला आहे. दोन्ही मित्रांनी डोहात एकत्र उडी घेतली मात्र, एक वर आलाच नाही. माज शेख असं मृत तरुणाचं नाव आहे. तो मिरा-भाईंदर येथील रहिवासी आहे. तो पाण्यात बुडाला. त्याशिवाय, दुसरा वर आला, पण तोही गंभीर जखमी झाला होता. (हेही वाचा:Boy Death While Playing Cricket: खेळ जीवावर बेतला! क्रिकेट खेळताना गुंप्तांगावर बॉल लागल्याने चिमुकल्याचा मृत्यू, पुण्यातील घटना)
तर जोएफ शेख असं जखमी तरुणाचं नाव आहे. त्याच्या कमरेला, पायाला आणि मानेला जबर मार लागला आहे. जोएफला उपचारासाठी जोएफला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिरा-भाईंदर येथे राहणारे तीन तरुण रविवारी पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यात असलेल्या दाभोसा धबधब्याजवळ आले होते. कदाचीत नवखे असल्यामुळे त्यांना डोहातील पाण्याचा आणि डोहाच्या खोलीचा अंदाज नव्हता. तिघांपैकी दोन तरुणांनी धबधबा सुरू होतो तेथून थेट पाण्यात उडी घेतली. तिसरा तरुण त्यांचा व्हिडीओ काढत होता. ही घटना लक्षात येताच तिसऱ्या तरूणाने आरडाओरडा केला. त्यानंतर काही स्थानिकांनी धबधब्यावर धाव घेत जोएफला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.
होडातील पाण्याचा अंदाज न येणे, डोहाची खोली न जाणता, पोहण्याची क्षमती कमी असतानाही उंचावरून उडी घेतल्याने तरुणाचा मृत्यू झाला. पवसाळ्यात तर अशा भरपूर घडतात. त्यामुळे नागरिकांना सावध राहून पर्यटनाचा आनंद घेणे गरजेचे आहे.