Boy Death While Playing Cricket: खेळ जीवावर बेतला! क्रिकेट खेळताना गुंप्तांगावर बॉल लागल्याने चिमुकल्याचा मृत्यू, पुण्यातील घटना
Death | (Image used for representational purpose only) (Photo Credits: Pixabay)

Boy Death While Playing Cricket: क्रिकेट खेळताना गुप्तांगावर बॉल लागल्याने चिमुरड्याचा मृत्यू झाल्याची घटना पुण्यातून (Pune News) समोर आली आहे. शौर्य ऊर्फ शंभू कालिदास खांदवे, असं मृत्यू झालेल्या ११ वर्षीय मुलाचं नाव आहे. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील लोहगाव भागात ही धक्कादायक घटना घडली आहे. शंभू हा शाळेला उन्हाळी सुट्या असल्यामुळे गुरुवारी संध्याकाळी त्याच्या मित्रांसोबत क्रिकेट खेळत (Boy Death While Playing Cricket) होता. खेळताना अचानक समोरून येणारा बॉल शंभुच्या गुप्तांगावर लागला आणि तो मैदानावरच कोसळला(Boy Death Due To Ball Hit). वेदना असह्य झाल्यामुळे तो ओरडत होता. (हेही वाचा : Mumbai News: खेळ जीवावर बेतला! कारमध्ये अडकलेल्या बहीण भावाचा गुदमरुन मृत्यू; अँटॉप हिल परिसरातील घटना)

मार लागल्यानंतर काही वेळाने त्याने उठून उभे राहण्याचा प्रयतन केला. मात्र, तरीही त्याला वेदना असह्य झाल्यामुळे तो पुन्हा परत मैदानावर पडला. या दरम्यान शौर्यच्या मित्रांनी आरडाओरडा केला. तिथे असलेल्या नागरिकांनी शौर्यला खाजगी रुग्णालयात दाखल केले. शौर्य काहीच हलचाल करत नसल्याने आणि डॉक्टरांच्या तपासणीत डॉक्टरांनी शंभूला मृत घोषित केले. याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात शंभूच्या आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

उन्हाळ्याच्या सुट्टीत लहान मुले बेफामपणे बाहेर खेळायला जातात. काहीवेळा जास्त अग्रेसीवपणे खेळल्यामुळे अनेकवेळा मुले जखमी होतात. अशा वेळेला पालकांनी पाल्यांवर लक्ष ठेवणं जास्त महत्त्वाच ठरतं.