Mumbai News: साजिद मोहम्मद शेख, (वय ७) आणि रीना शेख (वय,५) हे दोघेही अँटॉप हिल येथे घरापासून थोड्या अंतरावर खेळत होते. मात्र, काही वेळाने ते नातेवाईकांना दिसेणासे झाले. नातेवाईकांनी पोलिसांत तक्रार केली असता. घरापासून 50 मीटर अंतरावर असलेल्या एका बंद कारमध्ये त्यांचा मृतदेह आढळला. मुले खेळता खेळता गाडीमध्ये बसले असावेत, गाडी लॉक झाल्यामुळे श्वास गुदमरुन (Suffocate) त्यांचा मृत्यू (Death) झाला असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, दोन्ही मुलांचे मृतदेह सायन हॉस्पिटलमध्ये शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. अँटॉप हिल (Antop Hill)पोलीस ठाण्यात याप्रकरणी आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. (हेही वाचा :Mumbai Fire : अँटॉप हिल परिसरात सिलिंडरचा स्फोट, दोन जखमी; अग्निशमन दल घटनास्थळी दाखल )

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)