Viral Video:  सोशल मीडियावर असंख्य व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही व्हिडिओ हे रस्त्यावरील अपघाताचे असतात. तर काही रस्त्यावरील स्टंटचे. तसाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एक तरुण भररस्त्यात हात सोडून दुचाकी चालवत स्टंट करत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच, बिहार पोलिसांनी तरुणाला शिक्षा दिली आहे. पोलिसांनी तरुणाला पकडलं आणि त्याच्याकडून बाईक जप्त केली.  व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, तरुण हात सोडून बाईक चालवत होता. त्याच्या पाठी मागून पोलिसांची गाडी दिसत आहे. तरुणाला पोलिसांनी पकडलं आणि त्याच्यावर पोलिसांनी कारवाई देखील केली आहे. रस्त्यावर वाहनं चालवताना नियमांचे पालन करणं हे अत्यंत महत्त्वाचे असते. ट्रॉफिक पोलिस नेहमी वाहतुकीचे नियम पालन करण्यासाठी सांगत असतात. परंतु प्रसिध्दी मिळवण्यासाठी तरुण मंडळी आजकाल वाहतुकीचे नियम पालन न करता व्हिडिओ शुट करत असतात. (हेही वाचा- संपत्तीच्या वादातून महिलेची पतीला घरात साखळीने बांधून 3 दिवस मारहाण

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)