
Woman Ties Her Husband With Iron Chain: तेलंगणामधून (Telangana) अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका 45 वर्षीय महिलेने मालमत्तेवरून पतीला तीन दिवस बेड्या ठोकल्या आणि तिच्यावर अत्याचार केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित व्यक्तीचं नाव पट्टी नरसिंहा असं असून तो 50 वर्षाचा आहे. तसेच त्याच्या पत्नीचं नाव भरतम्मा असे आहे. या जोडप्यामध्ये मालमत्तेवरून वाद झाला. नरसिंहाच्या नावावर असलेल्या जमिनीच्या विक्रीवरून त्यांची दोन मुले आणि दोन मुलींमध्ये सातत्याने भांडणे होत होते.
वृत्तानुसार, पतीने आपल्या पत्नीच्या मालकीच्या जमिनीवर घर बांधले. तथापि, घर बांधताना त्याने घेतलेले कर्ज फेडण्यासाठी त्याने आपल्या नावावर असलेली जमीन विकण्याचा प्रस्ताव ठेवला. त्यानंतर वाद सुरू झाला आणि नरसिंह घर सोडून एकटेच राहू लागले. (हेही वाचा -Agra Teachers Fight Video: शाळेत उशिरा आल्यावरून शिक्षिका आणि मुख्यध्यापकांमध्ये बेदम मारहाण, आग्रातील घटना)
प्राप्त माहितीनुसार, 30 एप्रिल रोजी भरतम्मा, तिचा नवरा भुवनगिरी जिल्ह्यात राहत असल्याचे समजल्यानंतर ती तिच्या मुलांसह त्याला भेटायला गेली आणि त्याला घरी घेऊन आली. त्यानंतर तिने नरसिंहाला लोखंडी साखळदंडाने बांधून एका खोलीत बंद केले. तसेच तीन दिवस बेदम मारहाण केली.
पहा व्हिडिओ -
தொல்லை தாங்காமல் தப்பி ஓடிய கணவர்.. சங்கிலியால் கட்டிவைத்து கொடுமை செய்த மனைவி..!#Telangana #Wife #Torture #Husbend #Police #NewsTamil24x7 pic.twitter.com/AIzb0l3rai
— News Tamil 24x7 | நியூஸ் தமிழ் 24x7 (@NewsTamilTV24x7) May 4, 2024
स्थानिकांनी गुपचूप त्यांच्या मोबाइल फोनवर या घटनेचे चित्रीकरण केले आणि एका माजी एमपीटीसी सदस्याला याची माहिती दिली. ज्यांनी नंतर पोलिसांकडे धाव घेतली. पोलिस त्यांच्या घरी पोहोचल्यानंतर त्यांनी नरसिम्हाला सोडले आणि त्यांना सोबत पोलिस ठाण्यात नेले. पोलिसांनी सांगितले की, महिला आणि तिच्या मुलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून ते सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.