Coronavirus | Representative Image (Photo Credit: PTI)

देशात महाराष्ट्र (Maharashtra) आणि मुंबई (Mumbai) या ठिकाणी कोरोना व्हायरस (Coronavirus) संक्रमित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. राज्यात आज 2940 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता 44582 अशी झाली आहे. मुंबईबाबत बोलायचे झाले तर, आज शहरात 1751 नवीन कोविड-19 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत व 27 मृत्यूची नोंद झाली आहे. यासह एकूण सकारात्मक घटनांची संख्या 27,068 वर गेली आहे. मुंबई महानगरपालिकेने (BMC) याबाबत माहिती दिली. आज मुंबईमध्ये एकूण 780 संशयित रुग्णांना भरती करण्यात आले आहे.

मुंबईमध्ये आज 329 कोरोना व्हायरस संक्रमित रुग्ण बरे झाले असून त्यांना डिसचार्ज देण्यात आला आहे. मुंबईच्या धारावी भागात आज नवीन 53 कोविड-19 19 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. धारावीतील एकूण सकारात्मक घटनांमध्ये 1478 इतकी वाढ झाली आहे आणि 57 मृत्यूंची नोंद झाली आहे.

एएनआय ट्वीट -

महाराष्ट्रात आज सर्वाधिक म्हणजे, 2940 नव्या कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली झाली आहे. याशिवाय आज 857 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण 12 हजार 583 रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. तसेच राज्यात सध्या एकूण 30 हजार 474 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. (हेही वाचा: महाराष्ट्रात आज 2940 नव्या कोरोना बाधीत रुग्णांची वाढ; राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 44582 वर पोहोचली)

दरम्यान, कोरोनाची लक्षणे दिसूनही भीती व गैरसमजापोटी अनेक रुग्ण उपचारासाठी पुढे येत नसल्याचे निदर्शनास आल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे. अशा व्यक्ती शेवटच्या क्षणाला दवाखान्यात दाखल झाल्यास त्यांच्यावर उपचार करणे कठीण होते. मात्र 100 कोरोना रुग्णांपैकी 97 रुग्ण होतात बरे, हेही लोकांपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे, ज्यामुळे कोरोनाची लक्षणे जाणवल्यास लोक स्वतःहून उपचारासाठी पुढे येतील.