Maharashtra Coronavirus Update: महाराष्ट्रात आज 2940 नव्या कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली झाली असून राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 44582 वर पोहोचली आहे. याशिवाय आज 857 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण 12 हजार 583 रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. तसेच राज्यात सध्या एकूण 30 हजार 474 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. यासंदर्भात आरोग्य मंत्रालयाने माहिती दिली आहे.
राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण हे मुंबई शहरात आढळून येत आहेत. मुंबई शिवाय ठाणे, पुणे, औरंगाबाद, नागपूर, जळगाव, नाशिक जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. दिवसेंदिवस कोरोना संक्रमण वाढत असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरत आहे. आज मुंबईतील हॉटस्पॉट असलेल्या धारावीत 53 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे धारावीतील कोरोनाग्रस्तांची संख्या 1478 वर पोहोचली आहे. तसेच आतापर्यंत धारावीत 57 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. (हेही वाचा - Coronavirus Update: भारतात COVID-19 रुग्णांच्या संख्येत आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ, 6088 नव्या रुग्णांसह कोरोना संक्रमितांची एकूण संख्या 1,18,447)
Maharashtra records highest spike of 2940 COVID-19 cases in a single day today, taking the total number of positive cases in the state to 44,582: State Health Department pic.twitter.com/75H7Ha54PP
— ANI (@ANI) May 22, 2020
भारतात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. गेल्या 24 तासांत देशात 6088 नवे रुग्ण आढळले असून 148 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे देशात एकूण कोरोना संक्रमितांची संख्या 1,18,447 वर पोहोचली आहे. तसेच आतापर्यंत 3583 रुग्णांचा कोरोमामुळे बळी गेला आहे. भारतात सध्या 66,330 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर 48,534 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.