भारतात (India) कोरोनाने अक्षरश: धुमाकूळ घातला असून गेल्या 24 तासांत तर कोरोना बाधितांच्या संख्येने आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ झाली आहे. गेल्या 24 तासांत 6088 नवे रुग्ण आढळले असून 148 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे देशात एकूण कोरोना संक्रमितांची संख्या 1,18,447 वर पोहोचली असून एकूण 3583 रुग्ण दगावल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने (Health Ministry on India) दिली आहे. भारतात सद्य स्थितीत 66,330 रुग्णांवर उपचार सुरु असून 48,534 रुग्ण बरे झाल्याची माहिती देखील आरोग्य विभागाकडून मिळत आहे.
तर महाराष्ट्र (Maharashtra) राज्यात काल दिवसभरात 2,345 नव्या रुग्णांची भर पडली असून राज्यात कोरोना रुग्णांची संख्या 41,642 इतकी झाली आहे. यात 1,454 रुग्णांचा मृत्यू झाला असून 11,726 रुग्ण बरे झाले आहेत. Coronavirus in Maharashtra: महाराष्ट्रात तुम्ही राहत असलेल्या जिल्ह्यात किती आहेत कोरोना रुग्ण, जाणून घ्या आजचे ताजे अपडेट्स
Spike of 6088 #COVID19 cases and 148 deaths in last 24 hours. https://t.co/r9eSU77JqF
— ANI (@ANI) May 22, 2020
भारतामध्ये लॉकडाऊन चौथ्या टप्प्यामध्ये पोहचला आहे. सुमारे 2 महिने ठप्प असलेली विमानसेवा आता हळूहळू सुरू केली जाणार आहे. मात्र त्यासाठी यंत्रणेसोबतच नागरिकांनादेखील काही नियम पाळण्याचे आवाहन सरकार कडून करण्यात आले आहेत. यामध्ये रेल्वे प्रवासी वाहतुकीच्या नियमावलीप्रमाणेच विमानप्रवासादरम्यान आरोग्य सेतू अॅप (Aarogya Setu app) बंधनकारक, थर्मल चेकिंग अशा महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
भारतात 25 मे पासून विशेष खबरदारीसह देशांतर्गत विमान सेवा सुरु करण्यात येणार असल्याची माहिती नागरी उड्डाण मंत्रालयाने दिली. त्यानंतर 21 मे ला नागरी उड्डाण मंत्री हरदीप सिंह पुरी (Civil Aviation Minister Hardeep Singh Puri) यांनी घेतलेल्या परिषदेत विमान प्रवासखर्चाची माहिती देण्यात आली आहे. "आम्ही किमान आणि कमाल भाडे आकारण्यावर भर दिला असून दिल्ली (Delhi) मुंबई (Mumbai) प्रवासाकरता किमान 3500 रुपये भाडे आकारण्यात आले आहे. हा प्रवास 90-120 मिनिटांचा असतो. तर कमाल भाडे 10000 रुपये इतके ठेवण्यात आले आहे. हे प्रवासभाडे पुढील 3 महिन्यांसाठी लागू करण्यात आले आहे. म्हणजेच 24 ऑगस्टच्या मध्यरात्रीपर्यंत हे तिकीटदर असतील," असे नागरी उड्डाण मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी सांगितले.