Coronavirus Update: महाराष्ट्रात कोरोनामुळे आजवर 10,695 मृत्यू; आज 6,741 नव्या रुग्णांसह कोरोनाबाधितांची संख्या 2,67,665 वर
Coronavirus Update (Photo Credit: Twitter)

Coronavirus Update In Maharashtra: महाराष्ट्र आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, कोरोना व्हायरस मुळे आज, 14 जुलै 2020  रोजी पर्यंत राज्यात एकूण 10,695 मृत्यू नोंदवले गेले आहेत. आजच्या दिवसभरात यातील 213 रुग्णांची नोंद झाली आहे. आज राज्यात नवीन 6,741 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले यानुसार राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 2,67,665 झाली आहे. यामध्ये दिलासादायक म्हणजेच आजच्या दिवसात एकूण 4500 रुग्णांनी कोरोनावर मात सुद्धा केली आहे यानुसार कोरोनाला हरवणाऱ्या रुग्णांची एकूण संख्या 1,49,007 इतकी झाली आहे. सद्य घडीला राज्यात 1,07,665 ऍक्टिव्ह कोरोना रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. Coronavirus: कोरोनामुळे गेल्या तीन दिवसात महाराष्ट्र पोलीस दलातील आणखी 4 कर्मचाऱ्यांचा मृत्यू

कोरोना रुग्णांची वाढती आकडेवारी पाहता महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात लॉक डाऊन जारी करण्यात आले आहे. पुण्यात हा आठवडा लॉक डाऊन असणार आहे तर रायगड मध्ये 15 ते 24 जुलै दरम्यान कडकडीत बंद पाळला जाईल. लातूर मध्ये उद्यापासून 30 जुलै पर्यंत लॉक डाऊन असणार आहे. याशिवाय कल्याण डोंबिवली, ठाणे, औरंगाबाद महानगरपालिका क्षेत्रात सुद्धा पालिका आयुक्तांकडून लॉक डाऊन घोषित करण्यात आले आहेत. मुंबईत केवळ कंटेनमेंट झोन्स बंद असतील बाकी 100% लॉक डाऊनची गरज नाही असे सांगण्यात आले आहे.

ANI ट्विट

दरम्यान, देशाच्या कोरोना रुग्णांची संख्या पाहिल्यास भारत आता लवकरच 10 लाख कोरोना रुग्णांचा टप्पा ओलांडण्याचा मार्गावर आहे, मात्र देशात आता कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट सुद्धा 63.02 टक्के इतका आहे, त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगितले जात आहे, महाराष्ट्रात सुद्धा रिकव्हरी रेट जवळपास 55 टक्क्यांहून अधिक आहे.