Maharashtra Police | (PTI photo)

कोरोनाच्या (Coronavirus) वाढत्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्रात चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस कर्मचारी मोलाचा वाटा उचलत आहेत. याचपार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलीस दलात (Maharashtra Police) कोरोनाचा विळखा आणखी घट्ट होताना दिसत आहेत. महाराष्ट्रात गेल्या तीन दिवसांत आणखी चार पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. महत्वाचे म्हणजे, कोरोनामुळे महाराष्ट्र पोलीस दलातील एकूण 82 जणांनी आपली जीव गमावला आहे. यामुळे प्रशासनापुढे कोरोनाचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

जितेंद्र भालेराव (वय 38, कॉन्स्टेबल, वाळीव), अविनाश दडेकर (वय 47, हेड कॉन्स्टेबल, नवीमुंबई), सुरेश जाधव (वय 55, ट्रॉफिक एएसआय) आणि अनिल रणपिसे (स्पेशल ब्रॅन्च-1, एएसआय) असे कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची नाव आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, जितेंद्र भालेराव मुर्बाड येथील रहवासी असून नालासोपारा येथील एका खाजगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु होते. अविनाश दडेकर यांना 18 जून रोजी मुंबईतील फोर्टीस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा सोमवारी मृत्यू झाला आहे. रणपिसे यांना 3 जुलै रोजी मालाड येथील लाईन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तसेच 7 जुलै रोजी त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. मात्र, रविवारी त्यांचा उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला आहे, अशी माहिती मुंबई मिरोरने दिली आहे. हे देखील वाचा- Coronavirus Update: मुंबई, पुणे, ठाणे सह महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात किती कोरोना रुग्ण आहेत जाणून घ्या

अनिल देशमुख यांचे ट्विट-

महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र पोलीस दलातील एकूण 6 हजार 393 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 82 पोलीस कर्मचाऱ्यांचा कोरोनाशी लढताना मृत्यू झाला आहे. तर, 5 हजार 99 पोलीस कर्मचाऱ्यांनी कोरोनावर मात केली आहे.