Maharashtra Board HSC Result 2019: महाराष्ट्र बोर्डाचा निकाल अपेक्षेप्रमाणे आज (28 मे) दिवशी जाहीर करण्यात आला आहे. राज्यात यंदा बारावीचा निकाल 85.88% लागला आहे. तर विद्यार्थ्यांना त्यांचे गुण दुपारी 1 वाजल्यापासून शिक्षण मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर पाहता येणार आहे. त्यासाठी शिक्षण मंडळाची आणि सोबतच mahresult.nic.in, www.mahresult.nic.in, ww.resul.mkcl.org, www.maharashtraeducation.com वेबसाईट्स खुल्या करण्यात आल्या आहेत. आज विद्यार्थ्यांना केवळ ऑनलाईन स्वरूपात निकाल पाहता येईल. त्यानंतर महाविद्यालयात गुणपत्रिका उपलब्ध करून दिल्या जातील. ऑनलाईन वेबसाईट सोबत बारावीच्या विद्यार्थ्यांना SMS च्या माध्यमातूनही निकाल पाहण्याची सोय आहे.
आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्सचे विद्यार्थी कसा पाहू शकतील त्यांचा 12 वीचा निकाल?
- mahresult.nic.in ही किंवा वर दिल्यापैकी बोर्डाची कोणतीही अधिकृत वेबसाईट सुरु करा.
- अधिकृत वेबसाईटच्या होमपेजवर Latest Announcement Of the HSC Results चा पर्याय दिसेल.
- त्यानंतर HSC Examination Result 2019 वर क्लिक करा
- आता तुम्हांला एका नव्या विंडोवर रिडिरेक्ट केलं जाईल, तिथे तुम्हांला रोल नंबर (Roll Number) आणि आईचं नाव (Mother's Name) टाईप करायचं आहे.
- त्यापुढे View Result वर क्लिक करा
- तुम्ही उत्तीर्ण असाल तर तुम्हांला तुमचा निकाल पाहता येईल
- तुमच्या निकालाची प्रिंट आऊट काढण्याची, सेव्ह करण्याची सोय आहे
यंदा बारावीच्या परीक्षेला एकूण 14,21,936 विद्यार्थी सामोरे गेले. त्यापैकी मुलींचा निकाल 90.25% आणि मुलांचा निकाल 82.40% लागला आहे. कोकण विभागाचा सर्वाधिक 93.23% तर सर्वात कमी नागपूर विभागाचा 82.05% इतका निकाल लागला आहे.