Maharashtra Board 12th Std Results 2019: 12 वीचा निकाल SMS च्या माध्यामातून BSNL, Tata, Vodafone युजर्स कसा पाहू शकाल?
HSC Results 2019 (Photo Credits: Pixabay)

MSBSHSE 12 th Result Date & Time: देशभरात CBSE, ICSE पाठोपाठ विविध बोर्डाचे दहावी, बारावीचे निकाल जाहीर झाले. त्यामुळे सहाजिकच महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना त्यांच्या बारावी निकालाचे वेध लागले होते. मात्र आता विद्यार्थ्यांची प्रतिक्षा संपली आहे. आज (28 मे) दिवशी दुपारी 1 वाजता निकाल जाहीर होणार आहे. अनेकदा निकालाच्या वेळेस वेबसाईट्सवर अतिताण आल्याने विद्यार्थ्यांची निराशा होते. म्हणूनच जर वेबसाईट्स हॅंग झाल्या तर मोबाईलवर झटपट तुमचा निकाल पाहण्यासाठी मंडळाकडून सोय करण्यात आली आहे. एसएमएसच्या (SMS) माध्यमातून तुम्हांला निकाल पहायचा असेल तर काय कराल?  Maharashtra Board SSC HSC Results 2019: 12,10 वीचा निकाल लवकरच; मेडिकल, इंजिनियरिंग ते FYJC अ‍ॅडमिशन साठी राखीव कोट्यात आरक्षणाचा फायदा मिळवण्यसाठी ही 5 सरकारी कागदपत्र ठेवा तयार

एसएमएसच्या माध्यामातून कसा पहाल निकाल?

एसएमएसच्या माध्यामातून निकाल पाहण्यासाठी तुम्हांला एक एसएमएस पाठवावा लागेल.

  • तुमच्या इनबॉक्समध्ये MHHSC (स्पेस) (seat No)टाईप करा.
  • हा मेसेज 57766 वर पाठवा.

हा पर्याय केवळ बीएसएनएलच्या ग्राहकांसाठी आहे.

Idea, Vodafone, Reliance, Tata, BSNL युजर्ससाठी त्यांना MAH12<Space><Roll No> 57766, 58888111 या क्रमांकावर पाठवल्यास त्यावर तुम्हांला तुमचा निकाल एसएमएसच्या माध्यामातून पाहता येईल.

कोणत्या वेबसाईट्सवर पहाल निकाल

  • mahresults.nic.in,
  • maharashtraeducation.com, results.mkcl.org,
  • mahahsscboard.maharashtra.gov.in,
  • mahahsscboard.in

विद्यार्थ्यांना शिक्षण मंडळाच्या अधिकृत वेबसाईट्ससोबत काही थर्ड पार्टी वेबसाईट्सवरही निकाल पाहता येणार आहे. दुपारी 1 नंतर विद्यार्थ्यांना गुणपत्रिका पाहता येईल. त्यानंतर अ‍ॅडमिशन प्रक्रिया सुरू होणार आहे.