Schools | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) नव्या 11 शाळांनाही सीबीएसई बोर्डाने (CBSE Board) मान्यता दिली आहे. काल मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी याबाबतची माहिती ट्वीट करत दिली आहे. बीएमसी शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी आणि समाजातील सार्‍या स्तरांपर्यंत दर्जेदार शिक्षण पोहचवण्यासाठी ही एक मोठी पायरी समजली जात आहे.

मुंबई मध्ये पालिका शाळांचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी पूर्वीपासूनच आदित्य ठाकरे काम करत होते. आता पालिका शाळांमध्ये राज्य मंडळासोबतच सीबीएसई बोर्ड देखील समाविष्ट होत आहे. याच्या बरोबरीनेच काही भागांत आयसीएसई आणि केंब्रिज बोर्डासोबतही काम सुरू आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिक्षण आता सामान्य मुंबईकरांच्या आवाक्यात आणण्याचा प्रशासनाचा हा प्रयत्न आहे. हे देखील वाचा:  मुंबई मध्ये 2022-23 मध्ये सुरू होणार भारतातील पहिली Cambridge Affiliated पालिका शाळा .

आदित्य ठाकरे ट्वीट

मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये कार्यरत सर्व शिक्षण मंडळांनी मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी, मराठी भाषेतून गुणात्मक शिक्षण देण्याची काळजी घ्यावी, असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी केले आहे. दरम्यान आता बीएमसी च्या शाळेचं नाव मुंबई पब्लिक स्कूल असं करण्यात आलं आहे. 15th Annual Education World India School Rankings Survey, 2021-22 मध्ये यंदा मुंबई मधील जोगेश्वरी आणि वरळी भागातील मुंबई पब्लिक स्कूल या देशातील टॉप 10 शाळांमध्ये निवडल्या गेल्या आहेत.

यंदा ड्रॉ द्वारा मुंबई पब्लिक स्कूल मध्ये अ‍ॅडमिशन प्रक्रिया राबवताना देखील अनेकांनी या शाळांना पसंती दिल्याचं पहायला मिळालं आहे.