मुंबई मध्ये 2022-23 मध्ये सुरू होणार भारतातील पहिली Cambridge Affiliated पालिका शाळा
School | Representational Image (Photo Credits: Pixabay)

मुंबई हे भारतातील पहिलं शहर ठरणार आहे ज्यामध्ये Cambridge-Affiliated म्युनिसिपल स्कूल सुरू होत आहे. या शाळेमध्ये उच्च दर्जाचे आणि मोफत शिक्षण पुरवले जाणार आहे. मुंबई मध्ये आतापर्यंत आयसीएससी (ICSE) आणि सीबीएससी (CBSE) शाळा पालिकेने सुरू केल्या होत्या त्यामध्ये एक पाऊल पुढे जात पालिका आता कॅम्ब्रिज सोबत करारबद्ध झालं आहे. काल (8 सप्टेंबर) मुंबई मध्ये तसा करार करण्ययत आला आहे.

पालिकेने 2020-21 आणि 2021-22 या शैक्षणिक वर्षामधेय दोन CICSE (ICSE Board)आणि 12 CBSE शाळा सुरू झाल्या आहे. या शाळांमध्ये पालकांनीही प्रवेश घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती. त्याच धर्तीवर आता 2022-23 मध्ये कॅम्ब्रिज सोबत करारबद्ध झालेली शाळा सुरू करण्याचा विचार आहे. त्याचं नेमकं ठिकाण अजून ठरवण्यात आलेले नाही. (नक्की वाचा: BMC च्या CBSE मुंबई पब्लिक स्कूल येथील प्रवेश, अभ्यासक्रम व इतर विषयांबाबत माहिती सत्र).

आदित्य ठाकरे  Tweet

मागील दीड वर्षांपासून कोरोना 19 जागतिक महामारीमुळे अनेक पालकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. आर्थिक विवंचनेमुळे मुलांचं नुकसान होऊ नये म्हणून अनेकांनी पालिकांच्या शाळा निवडल्या आहेत. सध्या पालिका शाळांमध्येही ऑनलाईन माध्यमातून शिक्षण दिले जात आहे. आता कॅम्ब्रिज शाळांसाठी देखील शिक्षकांचे ट्रेनिंग सुरू झाले आहे. सध्या मुंबई मध्ये 1200 शाळा आहेत. तर सध्या मुंबई मध्ये  Cambridge-Affiliated 110  खाजगी शाळा आहेत.