
राज्य सरकारने वस्त्रोद्योग (Textile Industry) क्षेत्रावर आपले लक्ष विशेष केंद्रित केले आहे. त्यामुळे या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगार नर्मिती (Jobs in Textile Secto) होण्याची शक्यात कैक पटींनी वाढली आहे. वस्त्रोद्योग विभागातील सूत्रांच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, टेक्स्टाईल क्षेत्रात सरकारकडून 36,000 कोटी रुपयांची गुंतवणूक आणि 10 लाख नोकऱ्यांचे लक्ष्य ठेवण्यात आल आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर जर रोजगार निर्मिती झाली तर अनेकांच्या हाताला काम मिळून अनेकांचे संसार मार्गी लागणार आहेत.
द इंडियन एक्सप्रेसने याबात वृत्त दिले आहे. या वृत्तात म्हटले आहे की, नव्याने सत्तेत आलेले भाजप-सेना (शिंदे गट) ( BJP-Sena (BSS) सरकार पुढच्या अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल अशी सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे या काळात अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जाऊ शकतात. (हेही वाचा, Indian Navy Jobs for Women: महिलांसाठी भारतीय नौदलात नोकरीची संधी, विशेष कमांडो म्हणून मिळणार स्थान; वाचा सविस्तर)
देशाच्या एकूण कापूस उद्पादनात महाराष्ट्राचा वाटा 28% इतका आहे. त्यामळे आगामी काळात मराठवाडा आणि विदर्भ या विभागांमध्ये मोठ्या प्रमाणावर कापड क्षेत्र विकसीत करण्याची योजना आहे. आजघडीला राज्यातील कापूस लागवडीलखाली क्षेत्र सुमारे 42 लाख हेक्टर इतके आहे. या हेक्टरवर सुमारे 40 ते 45 लक्ष शेतकरी कपाशीचे उत्पन्न घेत असतात.
वस्त्रोद्योग क्षेत्राला चालना देण्यासाठी राज्य सरकार अनेक सवलती देणार आहे, यात वीज दरांमध्ये सवलत. कपासाच्या दिरांवर नियंत्रण आणि ते स्थिर राहतील याकडे विशेष लक्ष, उद्योगजकांना योग्य मोबदल्यात मनुष्यबळ उपलब्ध करुन देणे यांसारख्या या सवलती असू शकतात. दरम्यान, वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही राज्य सरकारने वस्त्रोद्योग क्षेत्राला चालना देण्यासाठी वीज दरात सवलत आणि कापसाचे दर स्थिर ठेवण्याचे आश्वासन दिले आहे.
दरम्यान, वस्त्रोद्योग क्षेत्राला चालना मिळावी यासाठी पीएम मेगा इंटिग्रेटेड टेक्सटाईल रीजन अँड अपेरल (पीएम मित्रा) योजनेअंतर्गत, राज्य सरकारने अमरावती (विदर्भ प्रदेश) आणि औरंगाबाद (मराठवाडा प्रदेश) येथे ब्राऊनफिल्ड पार्क विकसित करण्याचा प्रस्ताव दिला असल्याची माहिती आहे.