Close
Advertisement
 
सोमवार, डिसेंबर 16, 2024
ताज्या बातम्या
26 minutes ago

Maharashtra Monsoon 2019 Live Updates: 5 जुलैपर्यंत ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा

महाराष्ट्र टीम लेटेस्टली | Jul 01, 2019 08:47 PM IST
A+
A-
01 Jul, 20:47 (IST)

मुसळधार पावसाचा रायगड जिल्हा रुग्णालयालाही जोरदार फटका बसला. संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे जिल्हा रुग्णालयात पाणी घुसले. रुग्णालयात पाणी अचानक घुसल्याने रुग्णांची तसेच कर्तव्यावर असलेल्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचीही मोठी अडचण झाली.

01 Jul, 20:04 (IST)

मुंबई शहर आणि उपनगरांत कोसळलेल्या संततधार पावसाचा शहरातील रेल्वे आणि रस्ते वाहतुकीला मोठा फटका बसला. शहरात आणि रेल्वे मार्गांवर साचलेले पाणी त्यामुळे झालेली वाहतुक कोंडी आदी कारणांमुळे पश्चिम रेल्वे मार्गावरील धावणाऱ्या लोकल्सच्या सुमारे 100 फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.

01 Jul, 19:21 (IST)

मुंबई मध्य रेल्वेच्या सीएसएमटी आणि इतर स्थानकावरुन सुटणाऱ्या दीर्घ पल्याच्याच्या एक्सप्रेस गाड्या एक तास 50 मिनिटांनी उशिरा सुटणार आहेत. मध्य रेल्वेने ट्विटरद्वारे ही माहिती प्रवाशांना दिली.

11093 #CSMT-#Varanasi #Mahanagari #Express sch dep 0010 hrs on 2.7.2019 is #RESCHEDULED at 0200 hrs on 2.7.2019 (Delay by one hour 50 minutes). Inconvenience caused is regretted.

01 Jul, 19:21 (IST)

मुंबई मध्य रेल्वेच्या सीएसएमटी आणि इतर स्थानकावरुन सुटणाऱ्या दीर्घ पल्याच्याच्या एक्सप्रेस गाड्या एक तास 50 मिनिटांनी उशिरा सुटणार आहेत. मध्य रेल्वेने ट्विटरद्वारे ही माहिती प्रवाशांना दिली.

11093 #CSMT-#Varanasi #Mahanagari #Express sch dep 0010 hrs on 2.7.2019 is #RESCHEDULED at 0200 hrs on 2.7.2019 (Delay by one hour 50 minutes). Inconvenience caused is regretted.

01 Jul, 19:05 (IST)

मुंबई (Mumbai) शहरात सोमवारी (1 जुलै 2019) मुसळधार पाऊस पडला. गेल्या 48 तासात सरासरी तब्बल 550 मिलिमीटर पेक्षाही अधिक पाऊस झाला आहे. त्यामुळे नागरिकांना अधिकाधिक कमी त्रास होईल यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. तरीही नागरिकांना आम्ही सावधानतेचा आणि काळजी घेण्याची विनंती करतो, असे अवाहन मुंबई महापालिका ( BMC)  प्रशासनाने ट्विटरद्वारे केले आहे.

01 Jul, 18:46 (IST)

मालाड परिसरात अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळे मालाड सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. तर, या मार्गावरील वाहतूक दस्त मंदिर रस्ता, एसवी रोड मार्गे वळविण्यात आली आहे. 

Malad subway has been closed due to water logging. Traffic has been diverted via Datta Mandir Road- WEH towards S.V Road #TrafficUpdateMumbai #MumbaiRains #MumbaiRainsLive #MumbaiRainsLiveUpdates

— Mumbai Police (@MumbaiPolice) July 1, 2019

01 Jul, 18:34 (IST)

मुंबई शहरात पाणी साचल्याबद्दल प्रसारमाध्यमांनी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना विचारले असता, तुम्ही उगाच प्रश्न निर्माण करत आहात. मुंबई कुठेच तुंबली नाही. इतकंच नव्हे तर, कुठेही पाणी तुंबलेलं नाही किवा वाहतूक कोंडी झालेली नाही. मुंबईचे जनजीवन अजिबात विस्कळीत झालेलं नाही’, असा निराधार दावा केला.

 

01 Jul, 18:13 (IST)

मुंबई शहरात पावसाने आज दमदार हजेरी लावली. पावसाची संततधार कायम राहिल्याने. मध्य रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे ऑफिस संपल्यावर सायंकाळी घरी परतणाऱ्या मुंबईकरांची मोठी अडचण झाली.

01 Jul, 17:01 (IST)

5 जुलैपर्यंत ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यात अतिवृष्टी होणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

Load More

मुंबई सह महाराष्ट्राच्या अनेक भागात मान्सूनने काल रात्रीपासून दमदार हजेरी लावली. दरवर्षीपेक्षा यंदा मान्सूनचे आगमन उशिरा झाल्याने बळीराजासह सामान्य नागरिकही चिंतेत होते. मात्र उन्हाने तापलेल्या महाराष्ट्राला मान्सूनने थंडगार केले आहे.

मुंबईत सध्या पावसाने जोर धरला असून त्याचा परिणाम वाहतूकीवर झाला आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पावसाने लावलेल्या जोरदार हजेरीमुळे नोकरदारवर्गाची गैरसोय होण्याची शक्यता आहे. मुंबई शिवाय इतर भागातही होणाऱ्या दमदार पर्जन्यवृष्टीमुळे अनेक रेल्वे लोकल्स खोळंबल्या आहेत. तर काही रद्द करण्यात आल्या आहेत.

तर येथे पहा आज कोणत्या ठिकाणी किती पाऊस झाला आणि आजचा पावसाच्या अंदाजाचे लाईव्ह अपडेट्स...


Show Full Article Share Now