Rainy Tourism Tips In Marathi: पावसाळ्या निसर्गाचे सौंदर्य पाहण्यासाठी जाणे, त्यासाठी एकाधी कौटुंबीक किंवा मित्र-मैत्रिणींसोबत सहल आयोजित करणे ओघानेच आले. अशा सहलींच्या माध्यमातून पावसाळ्यात प्रवास (Monsoon Tourism Planning) करणे हा एक रोमांचक आणि अनोखा अनुभव असू शकतो. परंतु सुरक्षित आणि आनंददायी प्रवास सुनिश्चित करण्यासाठी काही अतिरिक्त सावधगिरी बाळगणे देखील आवश्यक आहे. पावसाळ्यात पर्यटनासाठी जाताना काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. अशाच काही महत्त्वाच्या गोष्टींबाबत आम्ही आपल्याला इथे काही टीप्स देतो आहोत. ज्यामुळे आपल्या पावसाळी सहली अधिक संस्मरणीय होऊ शकतील.
हवामान अंदाज: पर्यटन सहलीचे आयोजन करताना पहिल्यांदा आपले स्थान निश्चित करा. तेथील नैसर्गिक स्थिती, भुभाग आणि सांस्कृतीक वातावरण आदी गोष्टी विचारात घ्या. शिवाय त्या ठिकाणी सुरक्षेची स्थिती आणि हवामनाचा अंदाज याबाबत सतत अद्यायावत माहिती घेत राहा. सदर स्थळांवरील अचानक होणाऱ्या हवामान बदलांसाठी तयार राहा मगच पुढील आखणी करा.
योग्य कपडे सोबत घ्या: रेनकोट, पोंचो, वॉटरप्रूफ शूज आणि छत्र्यांसह जलरोधक आणि जलद वाळणारे कपडे सोबत घ्या. तसेच, काही हलके नरम आणि उबदार कपडे पॅक करा. काचणारे, सुखण्यास फार वेळ घेणारे कपडे शक्यतो टाळाच. ते न सुकल्याने कुबट वास येत राहतो आणि काचल्याने शरीराला संसर्गही होण्याचा धोका वाढतो. (हेही वाचा, Travel Tips During Monsoon: पावसाळ्यात फिरायला जाण्याचा विचार करत आहात का? 'या' गोष्टींची काळजी घेऊन करा आनंददायी आणि सुरक्षित प्रवास)
वॉटरप्रूफ बॅग: तुमची इलेक्ट्रॉनिक उपकरणे, प्रवासाची कागदपत्रे आणि इतर आवश्यक गोष्टी जलरोधक पिशव्या किंवा पाऊचमध्ये ठेवा जेणेकरून त्यांना पाण्याच्या नुकसानीपासून संरक्षण मिळेल. जर कधी त्या पावसात भिजल्याच तर जलरोधक पिशवीमुळे त्यांचे संरक्षण होईल.
योग्य पादत्राणे: प्रवासाला निघताना (खास करुन पावसाळी) योग्य पादत्राणांची निवड करा. शक्यतो लेदर, कॅन्वासचे शूज, चप्पल, सँडल टाळा. वॉटरफ्रूप शूज, सँडल केव्हाही चांगले. शक्यतो शूज किंवा सँडल वापरण्यास प्राधान्य द्या. चप्पल निसरड्या वातावरणात, जमीनीवर घसरण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे पायासोबत घट्ट राहतील आणि घसरणार नाहीत अशीच पादत्राणे वापरा.
प्रवास विमा: आनंद, उत्साह आणि सुखी जीवनासाठी पर्यटन आवश्यक असते. त्यासाठी प्रवास ओघानेच आला. असे असले तरी आणीबाणी केव्हाही येऊ शकते. त्यामुळे आपण कल्पनाही न केलेल्या संभाव्य धोक्यांबद्दल वेळीच सावधानता बाळगा. त्यासाठी प्रवासी विमा असणे केव्हाही महत्त्वाचे.
पर्यायी योजना तयार ठेवा: प्रवासाची आखणी करताना स्थळ, काळ आणि वेळेनुसार त्यात बदल करण्याचीही तयारी ठेवा. कारण कधी कधी सुरक्षा, नैसर्गिक आपत्ती किंवा इतर कारणांनी आपण नियोजनात गृहीत धरलेली ठिकाणे बंद ठेवली जाऊ शकतात. अशा वेळी प्रवासाचा वेळ आणि खर्च वाया जाऊ नये यासाठी पर्यायी योजना तयार ठेवा.
धोकादायक ठिकाणे टाळा: अनेकदा पर्यटनासाठी धबधबे, डोंगरकपारी अथवा तशीच निसर्गसमृद्ध असलेली ठिकाणी निवडली जातात. अशा वेळी भूस्खलन, पूरस्थिती अशी शक्यता असलेली ठिकाणे टाळा.
हायड्रेशन: पावसाळी आणि थंडी असली तरी हायड्रेटेड राहण्याचे लक्षात ठेवा, विशेषतः दमट परिस्थितीत. भरपूर पाणी प्या आणि अल्कोहोल आणि कॅफिनचे जास्त सेवन टाळा.
डासांपासून संरक्षण: पावसाळी हंगामामुळे डासांची संख्या वाढू शकते. मलेरिया आणि डेंग्यू सारखे आजार पसरवणारे मच्छर चावण्यापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी मच्छर प्रतिबंधक सोबत ठेवा आणि लांब बाही असलेले कपडे घाला.
स्थानिकांचा सल्ला: सुरक्षिततेच्या टिपा आणि पावसाळ्यात टाळण्याच्या क्षेत्रांबद्दल स्थानिकांचा किंवा सहल मार्गदर्शकांचा सल्ला घ्या. ते मौल्यवान अंतर्दृष्टी प्रदान करू शकतात आणि आपल्याला माहितीपूर्ण निर्णय घेण्यास मदत करू शकतात.
सुरक्षित राहण्याची सोय: पावसाळी हवामानाचा सामना करण्यासाठी तयार केलेल्या निवासस्थानांची निवड करा. तुम्ही राहता त्या ठिकाणी पाणी साचू नये यासाठी योग्य ड्रेनेज सिस्टिम असल्याची खात्री करा.
प्रथमोपचार किट घेऊन जा: बँड-एड्स, अँटीसेप्टिक क्रीम, वेदना कमी करणारे आणि तुम्हाला तुमच्या प्रवासादरम्यान आवश्यक असलेली औषधे असलेली प्राथमिक प्राथमिक उपचार किट सोबत बाळगा. शिवाय तुमची नियमीत औषधेही सोबत ठेवा.
संयम आणि सकारात्मक दृष्टीकोन: हवामानामुळे प्रवासाला होणारा विलंब किंवा योजनांमधील बदलांसाठी तयार रहा. सकारात्मक दृष्टीकोन ठेवा आणि तुमच्या सहलीचा जास्तीत जास्त फायदा घ्या. कधी कधी लक्ष विचलीत करणाऱ्या घटना घडू शकतात. त्याकडे दुर्लक्ष करा फक्त काळजी घ्या.
पावसाळी सहलीचे आयोजन करताना योग्य खबरदारी घेतल्यास, पावसाळ्यात प्रवास करताना तुम्हाला अधिक सुरक्षित आणि आनंददायी अनुभव घेता येईल. तुमच्या सुरक्षिततेला नेहमी प्राधान्य द्या आणि स्थानिक हवामान आणि सल्ल्याकडे लक्ष द्या. लक्षात ठेवा तुम्ही सहलीवर निघाला आहात. कार्यालयीन कामावर नव्हे. त्यामुळे आवश्यक तो मोकळेपणा ठेवा. योग्य ती काळजी ठेवा. तुमच्या आनंदात अधिक भर पडेल.