IndiGo Anniversary Sale 2019 सुरु; देशांतर्गत प्रवास अवघ्या 999 रुपयांत तर आंतरराष्ट्रीय विमानप्रवासासाठी मोजावे लागतील 3499 रुपये
IndiGo (Photo Credits: Wikimedia Commons)

इंडिगो एअरलाईन्सने (IndiGo Airlines) आपल्या 13 व्या वर्धापनदिनानिमित्त ग्राहकांसाठी विशेष सेल सुरु केला आहे. या सेलअंतर्गत ग्राहकांना देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवासावर डिस्काऊंट ऑफर्स दिल्या जात आहेत. या सेलअंतर्गत देशांतर्गत विमान प्रवासाचे किमान तिकीट 999 रुपये आहे. तर आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी तुम्हाला कमीत कमी 3499 रुपये मोजावे लागतील. (आयडी प्रुफ आणि बोर्डिंग पास विसरा, लवकरच केवळ चेहरा पाहून विमानतळावर मिळणार प्रवेश)

या ऑफरसाठी आज म्हणजेच 31 जुलै ते 4 ऑगस्टपर्यंत तुम्ही बुकिंग करु शकता. तसंच ही ऑफर 15 ऑगस्ट 2019 ते 28 मार्च 2020 पर्यंतच्या प्रवासासाठी व्हॅलिड राहिल. इंडिगोने ट्विट करत या ऑफरची माहिती दिली आहे. (विमान प्रवास महागणार, हवाई सुरक्षा शुल्कात 1जुलै पासून वाढ)

इंडिगो ट्विट:

ही ऑफर प्रस्थान (departure) च्या तारखेपासून कमीत कमी 15 दिवस आधी आणि ऑफर काळात बुकिंग केल्यानंतर स्वीकारली जाईल. तसंच 28 मार्च 2020 पर्यंतच्या प्रवासादरम्यानच या ऑफरचा लाभ मिळेल. (विमानप्रवासात आरोग्याच्या या '5' समस्यांकडे दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात !)

विशेष म्हणजे देशांतर्गत  बुकींगसाठी या ऑफरअंतर्गत 'बँक ऑफ बडोदा'चे डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड वापरल्यास कॅशबॅक ऑफर देखील उपलब्ध आहे. तसंच आंतरराष्ट्रीय विमानप्रवासाचे बुकिंग करताना 'येस बँके'चे क्रेडिट किंवा डेबिट कार्ड वापरल्यास कॅशबॅक ऑफर मिळेल.