भारतीय हवाई सुरक्षा शुल्कात 1 जुलैपासून वाढ करण्याचा निर्णय नागरी हवाई वाहतूक मंत्रालयातर्फे घेण्यात आला आहे.ज्यानुसार येत्या 1 जुलै पासून हा दर 130 रुपयांवरून 150 रुपये इतका करण्यात येईल. ही दरवाढ जरी शुल्लक वाटत असली तरी यामुळे येत्या काळात प्रवाश्यांना विमान प्रवास किंचित महाग पडणार आहे. या सोबतच विदेशी प्रवाश्यांसाठीचा दर आणखीन वाढवण्यात येणार असल्याची माहिती एका अधिकृत निवेदनातुन करण्यात आली आहे. यापूर्वी जिथे विदेशी पर्यटकांना एका तिकिटाच्या मागे हवाई सुरक्षा शुल्काच्या रूपात 225.52 रुपये (3.25 डॉलर) भरावे लागायचे त्याजागी आता 336.54 रुपये (4.85 डॉलर) द्यावे लागणार आहेत. Air India ची बंपर ऑफर; आता विमानप्रवास करा फक्त 979 रुपयांत
नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाच्या वतीने सात जूनला दिलेल्या आदेशानुसार हे हवाई सुरक्षा शुल्क हे अगोदरच्या प्रवासी सेवा शुल्काच्या जागी लागू करण्यात येणार आहे त्यामुळे नागरिकांना किमतीत मोठा फरक पडणार नाही. हवाई सुरक्षा शुल्काचे हे नवे दर 1 जुलै 2019 रोजी 12 वाजून एक मिनिटांनी लागू होतील आणि तेव्हापासून स्थनिक प्रवाश्यांसाठी 130 रुपये प्रवासी सेवा शुल्काऐवजी आता 150 हवी सुरक्षा शुल्क आकारण्यात येईल तर विदेशी पर्यटकांना देखील यापुढे 225 रुपयांच्या जागी 336 रुपये भरावे लागणार आहेत.