Air India ची बंपर ऑफर; आता विमानप्रवास करा फक्त 979 रुपयांत
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo credits: PTI)

आज संपूर्ण भारत प्रजासत्ताक दिन साजरा करीत आहे. या दिवसाचे औचित्य साधून एअर इंडिया (Air India) ने एक मोठी ऑफर आणली आहे. या ऑफरद्वारे देशांतर्गत प्रवासाचे तिकीट फक्त 979 रुपयांपासून उपलब्ध आहे. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तीन दिवसांत तिकीट बुक करावे लागणार आहे. तिकीट बुक करण्याची मुदत 26 जानेवारी ते 28 जानेवारी 2019 इतकी राहणर आहे. या तीन दिवसांत बुक केलेल्या तिकिटावर तुम्ही 30 सप्टेंबर 2019 पर्यंत प्रवास करू शकता. या ऑफरमध्ये आंतरराष्ट्रीय प्रवासावरही ऑफर देण्यात आल्या आहेत. यातील अमेरिकेचा प्रवास हा सर्वात स्वस्त आहे.

प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य, या तत्वावर तिकिटांची विक्री होणार आहे. यासाठी तुम्ही एअर इंडियाच्या वेबसाईटवरून, एअरलाईन बुकिंग ऑफिस, कॉल सेंटर्स आणि ट्रव्हल एजन्टकडून देखील या तिटिकांची खरेदी करू शकता. भारतामधील इकॉनमी क्लासचा विमान प्रवास हा  979 रुपयांपासून सुरु होईल. तर बिझनेस क्लासच्या तिकिटाचा तर 6 हजार 965 इतका असेल मात्र या दोन्ही तिकिटांवर कर लागू असतील. (हेही वाचा : विमानप्रवासात आरोग्याच्या या ‘5’ समस्यांकडे दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात !)

आंतरराष्ट्रीय विमान प्रवासात अमेरिकेचा विमान प्रवास हा सर्वात स्वस्त आहे. अमेरिकेच्या राऊंड ट्रिप तिकीटाची सुरुवातीची किमत 55 हजार आहे. ब्रिटन आणि युरोपसाठी 32 हजार तर ऑस्ट्रेलियासाठी 50 हजार इतका दर असणार आहे. पूर्व आशिया आणि दक्षिणपूर्व आशिया देशांतील प्रवासाचे तिकीट 11 हजार रुपयांपासून सुरु होणार आहे.