World Tourism Day : भारतातील ही '5' सुंदर बेटे देतील अविस्मरणीय अनुभव !
दीवार आयलँड (Photo Credit: wikimedia commons)

भारतात निसर्गसौंदर्याने नटलेल्या स्थळांची काही कमी नाही. भारतात अशी काही बेटे आहेत तेथील निसर्गसौंदर्य फक्त देशातील नाही तर परदेशी पर्यटकांनाही आकर्षित करतात. दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये तुम्हीही कोठे फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर हे पर्याय तुमच्यासाठी उत्तम आहेत. 10 हजारापेक्षा कमी खर्चात फिरा भारतातील या '5' सुंदर ठिकाणी !

गर्दी गोंधळ, ताणतणावापासून दूर जात शांततेत, निसर्गाच्या सान्निध्यात तुम्हाला आपल्या जवळ्याच्या व्यक्तींसोबत वेळ घालवायचा असेल तर तुम्ही या पर्यायांचा अवश्य विचार करु शकता. जाणून घेऊया अविस्मरणीय अनुभव देणाऱ्या या पर्यटनस्थळांविषयी... व्हिसाशिवाय आणि कमी बजेटमध्ये करा या '७' देशांची सफर !

अंदमान

गर्दी गोंधळापासून दूर शांततेत निर्सगाचा आनंद घेऊ इच्छित असाल तर अंदमान बेटाला नक्कीच भेट देऊ शकता. भारतातील हे बेट हनीमूनसाठी अतिशय खास आहे. सुंदर समुद्रकिनाऱ्यांसोबत येथील मनमोहन निसर्ग पर्यटकांना आकर्षित करतं. वर्षभरात केव्हाही तुम्ही अंदमानला जावू शकता. पण डिसेंबर ते फेब्रुवारी हा काळ येथे भेट देण्यासाठी उत्तम मानला जातो. सोलो ट्रिप प्लॅन करताय ? मग या '5' गोष्टी जरुर लक्षात ठेवा !

अंदमान बेट (Photo Credit: Pixabay)

लक्षद्वीप

लक्षद्वीप हे भारतातील सर्वात लहान द्वीप आहे. पण येथील निसर्गसौंदर्य मोहीत करणारे आहे. ताणतणावापासून दूर जात एक लहानसा ब्रेक घेऊ इच्छित असाल तर लक्षद्वीप हा पर्याय तुमच्यासाठी उत्तम आहे. ऑक्टोबर ते मे हा कालावधी येथे फिरण्यासाठी बेस्ट आहे.

लक्षद्वीप  (Photo Credit: wikimedia commons)

माजुली आयलँड

आसाममधील ब्रह्मपुत्रा नदीतच्या मध्यात वसलेले हे एक रिव्हर आयलॅंड आहे. येथील निसर्गाचे सौंदर्य आणि विविधता पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होते. येथील सनसेट आणि सनराईज अतिशय प्रेक्षणीय असतात. गोव्याप्रमाणे येथेही तुम्ही बाईक रेंटवर घेऊन या बेटाची सफर करु शकता. ऑक्टोबर ते डिसेंबरदरम्यान येथे फिरण्याची मज्जा काही औरच आहे.

माजुली आयलॅंड (Photo Credit: Wikipedia)

दीव आयलॅंड

गुजरातमधील जूनागड स्थित दीव आयलॅंडमध्ये पुर्तगाली संस्कृती झलक पाहायला मिळत असे. पण सध्या येथे गुजराती संस्कृतीचा खास प्रभाव जाणवतो. शांत, सुंदर समुद्रकिनाऱ्यांबरोबर येथील किल्ले, म्युझियम, मंदीर आणि चर्च या बेटाच्या सौंदर्यात भर घालतात. या बेटाला ऑक्टोबर ते जानेवारी या दरम्यान भेट द्या.

दीव आयलॅंड (Photo Credit: Pixabay)

सेंट मेरी आयलॅंड

कर्नाटकातील सेंट मेरी आयलॅंड हे चार लहान लहान द्वीपांचा एक समूह आहे. बेटाच्या बाजूचे निळसर पाणी आणि कोकोनट गार्डन पाहण्यासारखे आहे. डिसेंबर आणि जानेवारी हे दोन महिने येथे फिरण्यासाठी उत्तम मानले जातात.

सेंट मेरी आयलॅंड (Photo Credit: Wikimedia commons)