व्हिसाशिवाय आणि कमी बजेटमध्ये करा या '७' देशांची सफर !

सुट्टया मिळताच फिरायला जाण्याचे प्लॅन्स रंगतात. कामाच्या ताणापासून दूर, कुटुंबासोबत निसर्गरम्य ठिकाणी फिरण्याचा आनंदच काही वेगळा आहे. त्यात परदेशात फिरणे, हे तर प्रत्येकाचे स्वप्न असते. पण अनेकदा व्हिसा न मिळाल्याने किंवा बजेट न जमल्याने हे प्लॅन्स रद्द होतात आणि आनंदावर विरजण पडते. परंतु, आता नाराज होण्याची गरज नाही. कारण आता प्लॅन्स कॅन्सल होणार नाहीत.

अनेकांना हे माहित नसेल की, असेही काही देश आहेत जिथे फिरण्यासाठी व्हिसाची गरज लागत नाही. त्याचबरोबर अगदी कमी पैशात म्हणजेच तुमच्या बजेटमध्ये तुम्ही पर्यटनाचा आनंद लुटू शकता.

असे काही देश आहेत जिथे व्हिसा किंवा पैसे यांचा अडसर तुमच्या फिरण्यामध्ये न येता तुम्ही अगदी मनसोक्त फिरू शकता. तर जाणून घेऊया त्या देशांबद्दल...

नेपाळ

भारताजवळील नेपाळ देशामध्ये जाण्यासाठी व्हिसाची गरज भासत नाही. तसंच तेथे जाण्यासाठी फार खर्चही होत नाही.

थायलँड

शॉपिंगसाठी प्रसिद्ध असलेल्या थायलँडमध्ये तुम्ही व्हिसाशिवाय जावू शकता. थायलँडमध्ये भारतीयांसाठी ऑन अरायव्हल व्हिसा मिळण्याची सुविधा आहे. या देशात सुंदर व्दीप, गुफा आणि निळसर समुद्र पाहण्यासारखा आहे.

मॉरिशस

कपल्ससाठी हे अगदी आकर्षणाचे बिंदू आहे. हिंदी महासागरात वसलेला हा देश निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. जगभरातील सर्वात सुंदर द्वीपांपैकी मॉरिशस हे एक द्वीप आहे.

फिजी

दक्षिण प्रशांत महासागरातील मेलानेशियात एक द्वीप देश आहे फिजी. फिजीचे एक मुख्य द्वीप म्हणून विती लेवू प्रसिद्ध आहे. फिजीची संस्कृती ही भारतीय, युरोपीयन आणि चीनी परंपरेचे मिश्रण आहे. तेथे फिरण्यासाठी व्हिसाची गरज पडत नाही.

भुतान

हिमालयाच्या कुशीत वसलेला हा एक छोटासा देश. चीन आणि भारताच्या मधोमध असलेल्या या देशात जाण्यासाठी व्हिसा लागत नाही. त्याचबरोबर खर्चही कमी येतो.

श्रीलंका

कमी दिवसांचा फिरण्याचा प्लॅन असेल तर श्रीलंका हा तुमच्यासाठी अगदी योग्य पर्याय आहे. श्रीलंकेत फिरण्यासाठी भारतीयांकडून व्हिसा शुल्क आकारले जात नाही. सुंदर समुद्रकिनाऱ्यांसाठी हा देश अगदी प्रसिद्ध आहे.

इंडोनेशिया

इंडोनेशिया महाद्वीपाजवळ वसलेले बाली हे जगातील प्रसिद्ध पर्यटकस्थळांपैकी एक आहे. येथे भारतीय पर्यटकांना मोफत व्हिसाची सुविधा आहे. पर्यटन व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी इंडोनेशियाने ही योजना राबवली आहे.