Close
Search

10 हजारापेक्षा कमी खर्चात फिरा भारतातील या '5' सुंदर ठिकाणी !

पैशाअभावी अनेकदा प्लॅस रद्द करावे लागतात. पण आता असे होणार नाही. कारण भारतात अशी काही ठिकाणं आहेत जिथे फिरण्यासाठी 10 हजारांहून कमी खर्च होईल.

भटकंती Darshana Pawar|
10 हजारापेक्षा कमी खर्चात फिरा भारतातील या '5' सुंदर ठिकाणी !
प्रतिकात्मक फोटो (Photo Credit: Wikipedia)

सततची धावपळ, कामाचा ताण, दगदग यातून वेळ काढत निसर्गरम्य ठिकाणी फिरायला जाण्याचा आनंद काही निराळाच आहे. पण फिरायचे म्हटले की खर्च समोर दिसतो आणि प्लॅन्स बारगळतात. अनेकजण तर फिरण्यासाठी वर्षभर सेव्हींग करतात. पैशाअभावी अनेकदा प्लॅस रद्द करावे लागतात. पण आता असे होणार नाही. कारण भारतात अशी काही ठिकाणं आहेत जिथे फिरण्यासाठी 10 हजारांहून कमी खर्च होईल. तर जाणून घेऊया अशा काही पर्यटनस्थळांबद्दल...

शिमला

शिमल्यातील निसर्गसौंदर्य पर्यटकांचे मन मोहून टाकतं. जर तुम्हाला निसर्गसौंदर्याचा थाट पाहायचा असेल तर कुटुंबासमवेत शिमला नक्की फिरा. उन्हाळातील उन्हाच्या झळांपासून सुटका करायची असेल तर शिमलाला जरुर भेट द्या. त्या काळात अचानक स्नो फॉल सुरु होतो. त्यामुळे तुम्ही त्याचाही आनंद लुटू शकता. व्हिसाशिवाय आणि कमी बजेटमध्ये करा या '७' देशांची सफर !

नैनिताल

शहारातील गर्दी गोंगाटापासून दूर शांततेत निवांत काही क्षण घालवायचे असल्यास देवभूमितील नैनिताल हा उत्तम पर्याय आहे. नैनिताल हे एक हिल स्टेशन असून चहूबाजूंनी हिरवाईने आच्छादलेले आहे. या सुंदर दृश्यांच्या मधोमध तुम्ही बोटिंगचा आनंद घेऊ शकता.

ऋषिकेश

उत्तराखंडातील ऋषिकेशला दरवर्षी मोठ्या संख्येने पर्यटक येतात. अॅडव्हेंचरची आवड असलेले या स्थळाला भेट देतात. 5-10 हजार रुपये खर्च करुन तुम्ही फिरण्याचा आनंद घेऊ शकता. याशिवाय कॅपिंग, रिव्हर राफ्टिंग, बंजी जपिंग यांसारखे अॅडव्हेंचर स्पोर्ट्स एन्जॉय करु शकता. याशिवाय येथील पवित्र गंगेचे दर्शन शांतता आणि समाधान देते.

आग्रा

जगातील सात आश्चर्यांपैकी एक आश्चर्य म्हणजे ताजमहाल आग्रात आहे. तो पाहण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक आग्राला भेट देत असतात. याशिवाय फतेहपूर सिकरी, आग्रा फोर्ट यांसारख्या ऐतिहासिक वास्तूंचेही दर्शन घडते. येथे तुम्ही कुटुंबासमवेत 10 हजार रुपयांपेक्षा कमी खर्चात फिरु शकता.

जयपूर

राजस्थानची राजस्थानी वारसा, गौरवशाली इतिहास आणि परंपरा यांचा प्रयत्य येथे गेल्यावरच येतो. त्याचबरोबर पिंक सिटीत तुम्ही सुट्ट्या एन्जॉय करु शकता. जयपूरमधील महाल, फोर्ट, राजवाडे पर्यटकांना आकर्षित करतात. पण विशेष म्हणजे यासाठी तुम्हाला फार खर्च करावा लागणार नाही.

शहर पेट्रोल डीझल
कोल्हापूर 106.06 92.61
मुंबई 106.31 94.27
नागपूर 106.63 93.16
पुणे 106.42 92.92
View all
Currency Price Change