आजकाल सोलो ट्रिपचा ट्रेंड आहे. मुले-मुली बॅग पॅक करुन एकटेच फिरु लागले आहेत. सोलो ट्रिप साहसी, मजेशीर, आनंद देणारी असते. त्याचबरोबर तुम्हाला स्वतःला अधिक जाणून घेता येतं. पण ही ट्रिप वाटते तितकी मजेदार करण्यासाठी तुम्हाला काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. त्यासाठी या 5 टिप्स तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरतील...
कुटुंबियांना किंवा मित्रमंडळींना माहिती द्या
सोलो ट्रिपसाठी जात असलेल्या ठिकाणीची संपूर्ण माहिती तुमच्या कुटुंबियांना आणि मित्रमंडळींना द्या. याशिवाय ट्रिपदरम्यान नातेवाईक किंवा मित्रमंडळींच्या संपर्कात राहा. सोलो ट्रिपसाठी कोणत्या फ्लाईटने, ट्रेनने जाताय?, ट्रिप किती दिवसांची आहे?, कोठे राहणार? याबद्दलची सर्व माहिती नातेवाईक किंवा मित्रमंडळींना देणे गरजेचे आहे.
सामानाची काळजी
सोलो ट्रिपला निघताना आवश्यक तितकेच सामान घ्यावे. त्याचबरोबर पासपोर्ट, इतर महत्त्वाची कागदपत्रांच्या प्रतीसोबत घ्याव्यात. त्या वेगवेगळ्या फोल्डर्समध्ये व्यवस्थित ठेवाव्यात. त्याचबरोबर महत्त्वाची कागदपत्रं स्कॅन करुन ई-मेल किंवा लॅपटॉपमध्ये सेव्ह करावीत.
प्लॅनिंग करा
सर्व गोष्टी वेळ घेऊन प्लॅन करा. त्यामुळे आयत्या वेळी गडबड, धावपळ होणार नाही.
Must Visit List
प्रवासापूर्वीच Must Visit List तयार करुन घ्या. यामध्ये कोणकोणत्या स्थळांना भेट द्यायची आहे, हे पूर्वीच ठरवा. त्यामुळे तेथे गेल्यावर गडबड होणार नाही.
घाई करु नका
प्रवासादरम्यान कोणत्याही गोष्टीची घाई करु नका. विशेषत: एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाताना अजिबात घाई करु नका. घाई, गडबडीमुळे सोलो ट्रिपच्या छान आठवणी तुम्हाला साठवता येणार नाहीत. तसंच काहीतरी विसरण्याची आणि गोंधळ उडण्याचीही खूप शक्यता असते.