International Picnic Day: हिरव्यागार वनराईने वेढलेले कर्जत जवळील 5 उत्कृष्ट फार्म हाऊस
Family Picnic (Photo Credits: Instagram)

(Monsoon Picnic Spot): चातकपक्षी जितकी पावसाची आतुरतेने वाट पाहात असतो, तितकीच पावसाची वाट पाहतात ते पिकनिक लव्हर आणि ट्रेकर्स. पावसाळा सुरु झाला की मित्रपरिवार, नातेवाईक यांच्या ग्रुपमध्ये चर्चा रंगतेय ती पिकनिक ची ठिकाणं निवडण्याची. रोजच्या धकाधकीच्या जीवनातून आणि मुंबईतील गजबजाटापासून थोड्या शांत, हिरव्यागार अशा ठिकाणी पावसाचा आल्हाददायक अनुभव घेता येईल, अशा ठिकाणे निवडण्याचा सगळ्यांचा कल असतो. त्यात आपल्या कुटूबियांसोबत आपल्याला पिकनिकचा असा आल्हाददायक अनुभव घ्यायचा असेल तर सर्वात आधी आपल्या डोळ्यासमोर येते ते फार्म हाऊस. कारण कुटूंबियांसोबत आपले बच्चे कंपनीही असल्यामुळे आपल्या धबधबे, ट्रेकिंग ही ठिकाणं टाळतो. त्यामुळे कोणता फार्म हाऊस निवडावा या मोठ्या संभ्रमाता आपण असतो. म्हणून आज आम्ही तुम्हाला आंतरराष्ट्रीय पिकनिक डे दिवशी मुंबईनजीकचे असे 5 उत्त्कृष्ट फार्म हाऊस सांगणार आहोत, जेथे तुम्ही आपल्या कुटूंबियांसोबत आनंदाचे, सुखाचे क्षण घालवू शकता. पाहा कोणते आहेत ते फार्म हाऊस:

1. Tara Holidays (T2S फार्म ,Karjat):

चारही बाजूंनी हिरव्यागार वनराईच्या कुशीत असलेले T2S फार्म कर्जतमधील टाकवे गावाजवळ आहे. येथे तुम्हाला स्विमिंगपुल, वातानुकूलित रुम्स सारख्या आधुनिक सोयींसोबत प्रशस्त बगीचा, तसेच वेगवेगळे पक्षी, बदके येथे पाहायला मिळतील. त्यामुळे लहान मुले येथे छान एन्जॉय करु शकतील. आपल्या कुटूंबियांसोबत वन नाइट स्टे घालवण्याचा विचार असेल तर येथे अवश्य भेट द्या. सविस्तर माहितीसाठी पाहा

2. D N Farm (बदलापूर)

उंचच उंच डोंगर आणि पर्वतरांगांनी वेढलेले डी एन फार्म हे देखील पिकनिकसाठी उत्तम ठिकाण आहे. मुंबईपासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या बदलापूर येथे दहिवली गावात हे फार्म हाऊस आहे. येथे तुम्हाला मोफत वायफाय सह उत्तम जेवण, स्विमिंग पुल, मुलांसाठी गार्डन, प्रशस्त अशी पार्किंग जागा , तसेच पार्टी करण्यासाठी जागा आणि उत्तम अशी रुम सेवा मिळेल. सविस्तर माहितीसाठी पाहा

3. सुंदर फार्म (Sundar Farm, Karjat)

कर्जत रेल्वे स्टेशन पासून 3किमी अंतरावर असलेले हे फार्म हाऊस अतिशय सुंदर, नानाविध सुविधांनी ओतप्रोत भरलेले आहे. मुंबईच्या रोजच्या कलकलाटापासून शांत ठिकाणी तुमची सुट्टी घालवण्यासाठी जायचे असेल तर सुंदर फार्म एक चांगला पर्याय आहे. पक्ष्यांचा आवाज, हिरवीगार झाडे अशी शांत सकाळ येथे तुम्हाला पाहायला मिळेल. तसेच येथे धनुर्विद्या पाण्यातील वॉलीबॉल, नेमबाजी आणि काही थरारक असे प्रशिक्षणही येथे दिले जाते. तसेच येथून विकट गड, राजमाची आणि कोथलीगड जवळ असल्याने ट्रेकर्ससाठी हा उत्तम पर्याय आहे. सुंदर फार्म तुम्ही घरगुती कार्यक्रम जसे वाढदिवस, गेट टुगेदर यां सोबत कॉर्पोरेट मिटिंग्स, कॉन्फरन्सही करु शकतात. सविस्तर माहितीसाठी पाहा 

4. आनंदी फार्म (Anandi Farm, Karjat)

नेरळ स्टेशनपासून 10 मिनिटांच्या अंतरावर असलेल्या या फार्म हाऊस मध्ये तुम्हाला शांत आणि आल्हाददायक वातावरणाचा अनुभव घेता येईल. येथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची फुले, हिरवळीने नटलेले निसर्गसौंदर्य पाहता येईल. तसेच येथे तुम्हाला बरेच इन डोअर आणि आउट डोअर गेम्स खेळता येतील. तसेच येथे तुम्हाला शाकाहारी आणि मांसाहारी जेवणासोबत उत्तम बार्बेक्यूचा (Barbique) देखील आस्वाद घेता येईल. सविस्तर माहितीसाठी पाहा

5. Mayur Farm (Karjat)

कर्जत येथे टाटा पावर हाऊस नजीक हे मयूर फार्म वसलेले आहे. येथे तुम्हाला तुमच्या कुटूंबियांसोबत खूप छान वेळ घालवता येईल. येथे आधुनिक DJ म्यूजिक सिस्टमसह रेन डान्स, स्विमिंग पुलचा आनंद अनुभवता येईल. या फार्म शेजारी नदी आणि धबधब्याचाही अनुभव तुम्हाला घेता येईल. सविस्तर माहितीसाठी पाहा 

International Picnic Day 2019: यंदाच्या पावसाळयात निसर्गाच्या कुशीत नेणाऱ्या 'या' पाच सोप्प्या ट्रेक ना आवर्जून भेट द्या

आम्ही दिलेली ही माहिती थोडक्यात असून सविस्तर माहितीसाठी वर दिलेल्या लिंक वर क्लिक करुन संबधितांशी संपर्क साधा. मात्र यंदाच्या पावसाळ्यात तुम्ही मुंबईच्या गजबजाटापासून दूर अशा ठिकाणी जाण्याचा प्लान करत असाल तर या कर्जत जवळील या फार्म हाऊसचा अवश्य विचार करा आणि ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला नक्की कळवा.