वायू प्रदूषणापासून वाचण्यासाठी 'या' उपायांचा आधार घ्या!
वायू प्रदूषण (फोटो सौजन्य- Pixabay)

दिल्लीमध्ये वायू प्रदूषणामुळे आरोग्याच्या समस्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसून येत आहे. तसेच प्रदूषणाच्या या समस्येमुळे तेथील नागरिकांच्या तोंडी स्मॉग हा शब्द जास्त पाहायला मिळत आहे. तर स्मॉग म्हणजे धुके आणि धुळ यांचे मिश्रण होय. यामुळे आरोग्यावर परिणाम होतो आहे. तर या उपायांच्या आधारे वायू प्रदूषणापासून तुम्ही दूर राहू शकतात.

प्रदूषणामुळे होणारे आजार

- सर्दीला आमंत्रण

- श्वास घेण्यास त्रास होणे

-डोळ्यांची जळजळ

-खोकला, टीबी आणि घश्याचे आजार

-सायनस किंवा अस्थमा

- आतड्यांचे आजार

वायू प्रदूषणापासून वाचण्याचे मार्ग

- घरातून बाहेर जाताना नेहमी तोंडावर मास्कचा वापर करावा. तर डोळ्यांसाठी चष्माचा उपयोग करावा.

-चेहऱ्यावरील मास्कचा एकदाच उपयोग करावा. तो सारखा लावल्याने इंन्फेक्शन होण्याची शक्यता असते.

-तसेच घराबाहेर रस्त्यावर थोडे पाणी टाकावे. त्यामुळे धुळीचे कण जास्त प्रमाणात हवेमध्ये उडणार नाही.

-घराची साफसफाई करावी. तसेच घराबाहेर फिरण्यासाठी जायचे असेल योग्य ती काळजी घ्यावी.

प्रदूषणापासून वाचण्यासाठी डायट ठरवा

-खाणे खाऊन झाल्यानंतर गुळाचा तुकडा जरुर खा. त्यामुळे रक्त शुद्धीकरणास मदत होते.

-आताड्यांचा प्रदूषणापासून बचाव करण्यासाठी रोज गरम दूध प्यावे.

-तसेच दिवसातून जास्तीत जास्त पाणी प्यावे.

आयुर्वेदिक उपाय

- मधामध्ये काळी मिरी टाकून खाल्ल्यास आतड्यांमध्ये साठून राहिलेली सर्दी बाहेर निघण्यास मदत होते.

-जिराच्या झाडाच्या पानांचा रस प्यायल्याने शरीरातील रक्त शुद्धीकरणासोबत दूषित तत्व बाहेर येतात.

-तसेच थंड पाण्याऐवजी गरम पाणी प्यावे.