Surya Grahan 2019: वर्षाअखेरीच्या शेवटच्या सूर्यग्रहणाला 57 वर्षांनंतर जुळून आलाय 'हा' योग; वाचा सविस्तर
सूर्य ग्रहण 2019 (Photo Credits: Pixabay)

2019 च्या वर्षा अखेरीस येणारे शेवटचे सूर्यग्रहण (Solar Eclipse 2019) 26 डिसेंबर गुरुवारी आहे. हे सूर्यग्रहण पूर्ण नसून खंडग्रास स्वरूपातील असेल जे वलयाकार आकारात पाहयला मिळणार आहे, देशाच्या दक्षिणेकडील कर्नाटक (Karnatak), केरळ (Keral) आणि तामिळनाडू (Tamilnadu) मध्ये हे ग्रहण स्पष्टपणे दिसणार असून महाराष्ट्रात औरंगाबाद (Aurangabad) येथून अंशतः ग्रहण पजहता येणार आहे याशिवाय, उर्वरित देशात सूर्यग्रहण अर्धवट दिसेल. यंदाचे हे सूर्यग्रहण ज्योतिषांच्या माहितीनुसार अत्यंत खास असणार आहे या दिवशी तब्बल 57 वर्षांनी एक दुर्मिळ योग जुळून येणार आहे. ग्रहणाच्या वेळी सहा ग्रह एकत्र येणार आहेत, यापूर्वी 1962 मध्ये अशाच प्रकारे सात ग्रह एकत्र येऊन सूर्यग्रहण तयार झाले होते.

इतकेच नव्हे तर, काशी हिंदू विद्यापीठाचे डॉ गणेश प्रसाद मिश्रा यांचे म्हणणे आहे की, असे दुर्मिळ सूर्यग्रहण 296 वर्षांपूर्वी 7 जानेवारी 1723 रोजी झाले होते. त्यानंतर, आता 26 डिसेंबर 2019 रोजी ग्रह नक्षत्रांची स्थिती समान असेल.

भारतीय वेळेनुसार हे ग्रहण सकाळी 8.17 वाजेपासून सुरू होईल आणि सकाळी 10.57 पर्यंत प्रभावी राहील. म्हणजेच ग्रहण कालावधी साधारण 3.30 तास असेल. तर 25 डिसेंबर रोजी संध्याकाळी 5.32 वाजता सूर्यग्रहणा सुतकास प्रारंभ होईल, जे ग्रहण समाप्तीपर्यंत चालेल.(Surya Grahan 2019: वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण, तब्बल 296 वर्षांनतर दुर्मिळ योग; नैसर्गिक आपत्तीच्या चिन्हांसह, जाणून घ्या कोणत्या राशींना ठरेल लाभदायक)

दरम्यान, ग्रहणाच्या वेळी गरोदर महिनासहित काही  राशीच्या व्यक्तींनी खास काळजी घ्यायला हवी, या काळात पूजा-पाठ करणे टाळावे, आपल्या घरात जे काही खाण्यापिण्याचे पदार्थ आहेत त्या सर्वांवर तुळशीची पाने ठेवावी. ग्रहण संपताच संपूर्ण घर स्वच्छ करून घ्यावे. याकाळात घरात काहीही शिजवू नये किंवा काही खाऊ नये.

(टीप- संबधित लेख हा प्राप्त माहितीच्या आधारे लिहिण्यात आला आहे, यामार्फ़त लेटेस्टली मराठी कोणतीही अंधश्रद्धा पसरावी इच्छित नाही)