झोपेच्या गोळ्यांचे आरोग्यावर होणारे परिणाम (फोटो सौजन्य- Pixabay)

दिवसेंदिवस वाढत चालले मानसिक त्रास आणि समस्यांमुळे पुरेशी झोप मिळत नाही. त्यासाठी काही लोक डॉक्टरांचा सल्ला न घेता झोपेच्या गोळ्या घेण्यास सुरुवात करतात. परंतु झोपेच्या गोळ्या घेण्याच्या सवयीमुळे तुम्ही हृदयविकाराच्या झटक्याला आमंत्रण देत आहात हे माहिती आहे का? तर जाणून घ्या याचे आरोग्यावर काय परिणाम होतात.

-गर्भाव्यस्थेतील महिलेच्या बाळास त्रास

गर्भवती महिलांनी झोपेच्या गोळ्या घेतल्यास बाळाला त्रास होतो. तसेच त्याला विविध आजार जडण्याची शक्यता असते.तर गर्भवतीच्या वेळी झोप येत नसल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार गोळ्या घ्याव्यात.

-हृदयविकाराच्या झटक्याला आमंत्रण

रोजच्या रोज झोपेच्या गोळ्या हे हृदयविकाराच्या झटक्याला आमंत्रण देते. तर या गोळ्यांमधील जोपिडेम तत्वामुऴे हृदयाच्या आजारांची लागण होते.

-स्मरणशक्तीवर परिणाम

दीर्घ काळ झोपेच्या गोळ्या घेतल्याने स्मरणशक्ती कमी होते. तसेच शरीरातील पेशींवरही याचा परिणाम दिसून येतो. तर या गोळ्यांच्या अतिसेवनाने भूक कमी लागते.

- जास्त वजन असलेल्या व्यक्तींना धोका

जास्त वजन असलेल्या व्यक्तींनी चुकुनही झोपेच्या गोळ्यांचे सेवन करु नये. त्यामुळे आरोग्यावर त्या गोळ्यांचा परिणाम होतो.

- कोमामध्ये जाण्याची शक्यता वाढते

जे लोक दिवसातून एका गोळी ऐवजी जास्त गोळ्या घेतात अशा लोकांची कोमामध्ये जाण्याची जास्त शक्यता असते. तसेच या गोळ्यांमुळे उच्च दाब, डोके दुखणे आणि स्नायु संबंधित आजार होतात.